AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माची कॅप्टन इनिंग, निडर होत ठोकलं झंझावाती अर्धशतक

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील महत्त्वाच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने आपलं रौद्ररुप दाखवलं. ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज गोलंदाजांना कोणतीच दयामाया दाखवली नाही. गेल्या काही दिवसांपासून डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध फेल ठरत असलेल्या चर्चांनाही फूल स्टॉप दिला आहे. तसेच वर्ल्डकपमधील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकलं आहे.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्माची कॅप्टन इनिंग, निडर होत ठोकलं झंझावाती अर्धशतक
Image Credit source: Twitter
| Updated on: Jun 24, 2024 | 9:01 PM
Share

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर 8 फेरीत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरु आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. डावखुऱ्या गोलंदाजांना आऊट होतो असा ठपका त्याच्यावर गेल्या काही दिवसांपासून लागला होता. ऑस्ट्रेलियानेही मिचेल स्टार्क घेत असंच काहीसं दाखवलं होतं. पण रोहित शर्माने आतापर्यंतचा सर्वच राग त्याने चौकार आणि षटकार मारून काढला. इतकंच काय तर वर्ल्डकपमधील वेगवान अर्धशतक झळकावून एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित शर्माने 19 चेंडूत अर्धशतक झळकावलं. या खेळीत 5 षटकार आणि 4 चौकार मारले. त्याने 263.16 च्या स्ट्राईक रेटने अर्धशतक ठोकलं. यापूर्वी अमेरिकेच्या आरोन जोन्सने कॅनडाविरुदध 22 चेंडूत अर्धशतक झलकावलं होतं. त्यानंतर दक्षिण अफ्रिकेच्या क्विंटन डीकॉकने इंग्लंडविरुद्ध 22 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. ऑस्ट्रेलियाच्या मार्कस स्टोयनिसने स्कॉटलँडविरुद्ध 25 चेंडूत अर्धशतक, तर वेस्ट इंडिजच्या शाई होपने अमेरिकेविरुद्ध 26 चेंडूत अर्धशतकी खेळी केली होती.

रोहित शर्मा भारताकडून टी20 वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी 2007 मध्ये युवराज सिंगने इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावलं होतं. 2021 मध्ये केएल राहुलने स्कॉटलँडविरुद्ध 18 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. आता रोहित शर्माने 19 चेडूंत अर्धशतक झळकावले आहेत. 2007 मध्ये युवराज सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 चेंडूत, तर 2022 मध्ये सूर्यकुमार यादवने झिम्बाब्वेविरुद्ध 23 चेंडूत अर्धशतक ठोकलं होतं. दुसरीकडे, रोहित शर्माने आपल्या टी20 आंतरराष्ट्रीय  कारकिर्दित षटकारांचं द्वीशतकही पूर्ण केलं आहे. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा हा पहिला फलंदाज आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, ॲडम झाम्पा, जोश हेझलवूड.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.