IND vs AUS | रिचर्ड केटलबरो टीम इंडियासाठी पुन्हा अनलकी, अंपायरवर टीका
Richard Kettleborough | रिचर्ड केटलबरो भारतीय क्रिकेट संघासाठी आणि तमाम भारतीयांसाठी पुन्हा एकदा अनलकी ठरला आहे. रिचर्ड केटलबरो याच्या पंचगिरीत टीम इंडिया आयसीसी स्पर्धेतील बाद फेरीत सहाव्यांदा अपयशी ठरली आहे.

अहमदाबाद | ट्रॅव्हिस हेड याने केलेल्या 137 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 अंतिम सामन्यात विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने 241 धावांचं आव्हान मिळालं होतं. कांगारुंनी हे आव्हान 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. हेडशिवाय मार्नस लबुशेन याने 58 धावा केल्या. वॉर्नरने 1, मिचेल मार्शने 15, स्टीव्हन स्मिथ याने 4 आणि ग्लेन मॅक्सेवलने 2 धावा केल्या.
रिचर्ड केटलबरो या महाअंतिम सामन्यात अंपायर होता. हा अंपायर भारतासाठी पुन्हा एकदा अनलकी ठरला आहे. याआधी आयसीसी स्पर्धेतील बाद फेरीतील टीम इंडियाच्या 5 सामन्यात रिचर्ड केटलबरो अंपायर होता. त्या पाचही सामन्यात भारताला पराभूत व्हावं लागलं. तर यंदाही टीम इंडियाचा पराभव झाला. त्यामुळे नेटकरी रिचर्ड केटलबरो यालाही भारताच्या पराभवासाठी कारणीभूत ठरवलं जात आहे. तसेच या सामन्यानंतर सोशल मीडियावर पनौती हा हॅश्टॅग ट्रेंड होत आहे.
रिचर्ड केटलबरो टीम इंडियासाठी अनलकी
रिचर्ड केटलबरो याआधी टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील 5 नॉक आऊट मॅचमध्ये अंपायर होता. त्या 5 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. टीम इंडिया टी 20 वर्ल्ड कप फायनल 2014, टी 20 वर्ल्ड कप 2016 सेमी फायनल, 2015 वर्ल्ड कप सेमी फायनल, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल आणि 2019 वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पराभूत झाली. या वरील पाचही सामन्यात रिचर्ड केटलबरो अंपायर होता.
रिचर्ड केटलबरो टीकेचा धनी
Richard Kettleborough – 6, India – 0 pic.twitter.com/sUQOBYjJMT
— Yo Yo Funny Singh (@moronhumor) November 19, 2023
टीम इंडिया – 0 आणि रिचर्ड केटलबरो 6
Richard Kettleborough
2014T20WC Final (Onfield Umpire) 2015WC Semi (Onfield Umpire) 2016T20WC Semi (Onfield Umpire) 2017CT Final (Onfield Umpire) 2019WC Semi (Onfield Umpire) 2021WTC Final (TV Umpire) 2023WTC Final (TV Umpire)
🇮🇳 lost this all matches pic.twitter.com/XQXXIAzkMg
— Harsha (@HarshaTarak8) November 19, 2023
टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेईंग ईलेव्हन | पॅट कमिन्स (कॅप्टन), ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, एडम झाम्पा आणि जोश हेझलवूड.
