AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : पंत आणि केएल, दोघांपैकी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी, कॅप्टन रोहितने सांगितलं…

India Playing Eleven Against England In 1st Odi : इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडियात केएल राहुल आणि ऋषभ पंत असे 2 विकेटकीपर बॅट्समन आहेत. आता त्या दोघांपैकी कुणाला एकालाच विकेटकीपर म्हणून संधी मिळणार आहे. कॅप्टन रोहित शर्माने काय संकेत दिले?

IND vs ENG : पंत आणि केएल, दोघांपैकी प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी, कॅप्टन रोहितने सांगितलं...
rohit sharma team india captainImage Credit source: PTI
| Updated on: Feb 06, 2025 | 10:46 AM
Share

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात टी 20i मालिकेनंतर आता एकदिवसीय मालिकेचा थरार रंगणार आहे. एकूण 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 6 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. दोन्ही संघांमधील सलामीचा सामना हा नागपूरमधील व्हीसीए स्टेडियममध्ये होणार आहे. इंग्लंडने सामन्याआधीच प्लेइंग ईलेव्हन जाहीर केली आहे. मात्र टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये केएल राहुल आणि ऋषभ पंत या दोघांपैकी विकेटकीपर म्हणून कुणाला संधी मिळणार? याबाबत डोकेदुखी आहे. या दोघांपैकी कोणत्या एकाला निवडायचं ही डोकेदुखी असेल, असं कर्णधार रोहित शर्मा याने सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं.

रोहितने काय सांगितलं?

केएल राहुल याने 2023 मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत ऋषभ पंत याच्या अनुपस्थितीत विकटकीपर आणि बॅट्समन दोन्ही भूमिका चोखपणे पार पा़डल्या. “केएल राहुल गेल्या काही वर्षांपासून विकेटकीपिंग करतोय. केएलने चांगली कामगिरी केली आहे. केएलने गेल्या 10-15 तेच केलंय जे त्याकडून अपेक्षित होतं. ऋषभ पंतही उपस्थित आहे. आम्हाला त्या दोघांपैकी कुणा एकाला खेळवू शकतो. दोघांमध्येही सामना जिंकून देण्याची क्षमता आहे”, असं रोहितने म्हटलं.

दोघांपैकी कुणाला संधी?

“केएल आणि ऋषभ, या दोघांपैकी कुणाला खेळवायचं ही चांगली डोकेदुखी आहे. मात्र मागील कामगिरी पाहता सातत्य राखणं आमच्यासाठी महत्त्वाचं आहे”, असंही रोहितने नमूद केलं.

वरुण चक्रवर्तीबाबत काय म्हटलं?

मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती याने फिरकीच्या जोरावर इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत एकूण 14 विकेटस घेतल्या. वरुणला या कामगिरीसाठी मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. वरुणला याच कामगिरीच्या जोरावर एकदिवसीय मालिकेत संधी देण्यात आली. रोहितने वरुणला संधी देण्याबाबतही प्रतिक्रिया दिली.

“वरुणने निश्चितच काही तरी वेगळं करुन दाखवलं आहे. त्याने जरी हे टी 20i क्रिकेटमध्ये केलं असेल पण त्याच्यात काही तरी वेगळं असं आहे. आम्हाला एक पर्याय हवा होता. तसेच पाहायचं होतं की आम्ह त्याच्यासोबत काय करु शकतो”, असंही रोहितने सांगितलं.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा.

इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), जो रूट, हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक