IND vs ENG 2nd ODI: पंड्या-चहलने इंग्लंडला दिले धक्के, 15 षटकानंतर अशी आहे स्थिती

IND vs ENG 2nd ODI: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये दुसरा वनडे सामना सुरु आहे. ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर (Lords Ground) हा सामना खेळला जात आहे.

IND vs ENG 2nd ODI: पंड्या-चहलने इंग्लंडला दिले धक्के, 15 षटकानंतर अशी आहे स्थिती
hardik-pandyaImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 6:47 PM

मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये दुसरा वनडे सामना सुरु आहे. ऐतिहासिक लॉर्ड्सच्या मैदानावर (Lords Ground) हा सामना खेळला जात आहे. भारताचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारत आणि इंग्लंड मध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जात आहे. भारताने पहिला सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आज विजयी आघाडी मिळवण्याचा भारताचा पुरेपूर प्रयत्न असेल. नुकत्याच संपलेल्या टी 20 मालिकेत भारताने दमदार कामगिरी केली. भारताने 2-1 ने ही मालिका जिंकली होती. आता वनडे मालिकेत क्लीन स्वीप करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.

तशी सुरुवात करणं जमलेलं नाही

दुसऱ्या वनडेत भारताला पहिल्या सामन्याप्रमाणे सुरुवात करता आलेली नाही. पहिल्या सामन्यात भारताने सुरुवातीच्या षटकातच इंग्लंडला तडाखे दिले होते. आजच्या सामन्यात भारताला तसं करणं जमलेलं नाही. जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टोने आज चांगली सुरुवात केली. लॉर्ड्सची खेळपट्टी ओव्हल सारखी नाहीय. ओव्हलच्या पीचवर चेंडूला उसळी मिळत होती. तसा बाऊन्स इथे नाहीय. जेसन रॉयच्या रुपाने 41 धावांवर इंग्लंडची पहिली विकेट गेली. रॉय 23 धावांवर हार्दिक पंड्याच्या गोलंदाजीवर आऊट झाला. त्याने सूर्यकुमार यादवकडे झेल दिला. जेसन रॉयने 33 चेंडूत 23 धावा केल्या. यात 2 चौकार आणि 1 षटकार आहे.

बुमराह-शमीने पहिल्या स्पेल मध्ये कशी केली गोलंदाजी?

15 षटकांअखेरीस इंग्लंडची 2 बाद 72 अशी धावसंख्या आहे. आता बेन स्टोक्स आणि ज्यो रुटची जोडी मैदानात आहे. 15 व्या षटकात जॉनी बेयरस्टोला 38 धावांवर युजवेंद्र चहलने बोल्ड केलं. त्याने 38 चेंडूत 38 धावा करताना 6 चौकार लगावले.  मागच्या सामन्यातील यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहने 4 षटकात 16 धावा दिल्या. एक निर्धाव ओव्हर टाकली. मोहम्मद शमीने 4 षटकात 24 धावा दिल्या. पण त्यांना अजून विकेट काढणं जमलेलं नाही.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.