AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : 48 वर्षानंतर टीम इंडियाने रचला इतिहास, पहिल्यांदा इंग्लंडला 10 विकेट्सने हरवले, बुमराहने घेतल्या 6 विकेटस्, रोहित-धवनच्या बॅट तळपल्या

जसप्रीत बुमराहने त्याच्या करियरमधील बेस्ट परफॉर्मन्स आज दिला. त्याने १९ रन्स देत ६ विकेट्स पटकावल्या त्यामुळे इंग्लंडची टीम 26 व्या ओव्हरमध्येच 110 रन्सवर आलआऊट झाली. इंग्लंडच्या टीमचा हा टीम इंडियाविरोधातील सर्वात कमी स्कोअर आहे.

IND vs ENG : 48 वर्षानंतर टीम इंडियाने रचला इतिहास, पहिल्यांदा इंग्लंडला 10 विकेट्सने हरवले, बुमराहने घेतल्या 6 विकेटस्, रोहित-धवनच्या बॅट तळपल्या
दणदणीत विजय Image Credit source: Twitter
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 10:04 PM
Share

लंडन – टीम इंडियाने (Team India) 3 वन डेच्या सीरीजमध्ये पहिल्याच मॅचमध्ये इंग्लंडचा (Beat England) 10 विकेट्सने (10 Wickets)दारुण पराभव केला आहे. गेल्या 48 वर्षांत पहिल्यांदा टीम इंडियाने इंग्लंडविरोधात ही कामगिरी केली आहे. भारताने इंग्लंडविरोधात पहिल्यांदा 1974 साली वन डे मॅच खेळली होती. 110 रन्सचे टार्गेट घेऊन मैदानादत उतरलेल्या टीम इंडियाच्या बॅट्समनपैकी सर्वाधिक रन्स या रोहित शर्माने केल्या आहेत. त्याने 58  बॉल्समध्ये 78 रन्स केले. तर धवनने 54 बॉल्समध्ये 31  रन्स केल्या. जसप्रीत बुमराहने त्याच्या करियरमधील बेस्ट परफॉर्मन्स आज दिला. त्याने १९ रन्स देत ६ विकेट्स पटकावल्या त्यामुळे इंग्लंडची टीम 26 व्या ओव्हरमध्येच 110 रन्सवर आलआऊट झाली. इंग्लंडच्या टीमचा हा टीम इंडियाविरोधातील सर्वात कमी स्कोअर आहे.

जसप्रित बुमराह रॉकिंग

इंग्लंडच्या विरोधात वनडे मॅचमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विक्रम आता बुमराहचया नावे जमा झाला आहे. त्याने आशिष नेहराचा 19 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तोडला आहे. 2003 च्या वर्ल्डकपमध्ये नेहराने इंग्लंडच्याविरोधात 23 रन्स देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहसोबतच मोहम्मद शीनेही चांगली बॉलिंग करत 3 विकेट्स घेतल्या. पहिल्या 10 ओव्हरमध्येच इंग्लंडच्या 5 विकेट्स गेल्या होत्या. 2004 नंतर पहिल्यांदा अशी कामगिरी भारतीय बॉलर्सनी केली आहे.

दुसऱ्यांदा दहाही विकेट्स फास्ट बॉलर्सना

भारताकडून दहाही विकेट्स या फास्ट बॉलर्सना मिळाल्या आहेत. वन डे क्रिकेटमध्ये टीम इंडियाबाबत हे आत्तापर्यंत केवळ दुसऱ्यांदा घडते आहे. यापूर्वी 2014 साली बांग्लादेशच्या विरोधात मिरपूर वनडेत असे झाले होते. त्यावेळी बिन्नीने 6 तर मोहित शर्माने 6 विकेट्स घेतल्या होत्या.

कोहली दुखापतीमुळे बाहेर

विराट कोहली दुखापतीमुळे ही मॅच खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी श्रेयस अय्यरला संधी देण्यात आली होती. तिसऱ्या नंबरवर येण्याची संधी अय्यरला मिळालीच नाही. रोहित शर्मा आणि शिखर धवननेच मॅच एकहाती जिंकून दिली.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.