AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG 3rd ODI: सिराज, हार्दिकने इंग्लंडला दिले धक्के, 15 ओव्हर्सनंतर अशी आहे स्थिती

IND vs ENG 3rd ODI: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आज मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड येथे तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. भारताचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

IND vs ENG 3rd ODI: सिराज, हार्दिकने इंग्लंडला दिले धक्के, 15 ओव्हर्सनंतर अशी आहे स्थिती
आशिया चषका आगोदर टीम इंडियाला मोठा धक्का, पाठीच्या दुखण्यामुळे महत्त्वाचा गोलंदाज संघाबाहेर
| Updated on: Jul 17, 2022 | 4:52 PM
Share

मुंबई: भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) मध्ये आज मँचेस्टर ओल्ड ट्रॅफर्ड येथे तिसरा एकदिवसीय सामना सुरु आहे. भारताचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit sharma) नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील हा शेवटचा सामना आहे. इंग्लंडकडून जेसन रॉय (Jason Roy) आणि जॉनी बेयरस्टो ही सलामीची जोडी मैदानात उतरली होती. रॉयने इंग्लंडला धडाकेबाज सुरुवात करुन दिली होती. त्याने पहिली ओव्हर टाकणाऱ्या मोहम्मद शमीच्या पहिल्या तीन चेंडूंवर चौकार खेचले. पण इंग्लंडच्या सलामीवीरांना ही लय टिकवता आली नाही. मोहम्मद सिराजने दुसऱ्याच षटकात इंग्लंडला दोन धक्के दिले. त्याने जॉनी बेयरस्टोला खातेही उघडू दिले नाही. श्रेयस अय्यरकरवी झेलबाद केलं. त्याच षटकात ज्यो रुटची विकेटही सिराजने काढली. त्याने रोहित शर्माकरवी झेलबाद केलं. रुटही भोपळा फोडू शकला नाही.

हार्दिकने फोडली जमलेली जोडी

इंग्लंडची अवस्था 2 बाद 12 झाली होती. त्यानंतर खेळपट्टीवर आलेल्या बेन स्टोक्सने जेसन रॉय सोबत मिळून डाव सावरला. रॉय आणि स्टोक्सची जोडी जमली. दोघांनी तिसऱ्याविकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. हार्दिक पंड्याने अखेर ही जोडी फोडून भारताला तिसरं यश मिळवून दिलं. चांगली फलंदाजी करणाऱ्या जेसन रॉ़यने विकेटकीपर ऋषभ पंतकडे झेल दिला. 31 चेंडूत 41 धावा करताना त्याने 7 चौकार लगावले. 14 व्या षटकात हार्दिकने बेन स्टोक्सलाही आऊट केलं. आपल्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेतला.  स्टोक्सने 29 चेंडूत 27 धावा केल्या. यात चार चौकार आहेत.  आता मोइन अली आणि जोस बटलरची जोडी मैदानात आहे. 15 षटकांअखेरीस इंग्लंडची धावसंख्या चार बाद 80 आहे.

ओल्ड ट्रॅफर्डचा रेकॉर्ड काय सांगतो?

मँचेस्टर बद्दल बोलायच झाल्यास, इथे टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी स्वीकारतो. या मैदानावर वनडे सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड इंग्लंडच्या नावावर आहे. इंग्लंडने 396 धावा केल्या होत्या. या मैदानावर भारताची सर्वाधिक धावसंख्या 336 आहे

जसप्रीत बुमराह का खेळत नाहीय?

दुखापतीमुळे आजच्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळत नाहीय. त्याच्याजागी मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला आहे. रोहित शर्माने टॉसच्यावेळी बुमराह खेळत नसल्याची माहिती दिली. पाठिच्या दुखण्यामुळे बुमराह या मॅच मध्ये नाहीय. मालिकेचा निकाल निश्चित करणारी ही लढत आहे. भारताने पहिल्या सामन्यात इंग्लंड वर 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्सवर इंग्लंडने पलटवार केला. त्यांनी भारताचा 100 धावांनी पराभव केला.

'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'
'लाडकी बहीण योजनेला आमचा पाठिंबाच, पण शिंदेंना देखील पाठिंबा'.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?.
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा.
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा.....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!
गोगावलेंचा पैशांसोबत फोटो, महिला नेत्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ!.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं...
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार, तारीख काय? शिंदेंनी थेट सांगितलं....
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य
मस्ती करणारे दोन पायांवर घरी जाणार नाहीत, नितेश राणेंचे मोठे वक्तव्य.
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी
जुन्नरचा आमदार थेट बिबट्याच्या वेशात विधानभवनात अन् सरकारकडे काय मागणी.
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य
BMC निवडणुकीनंतर...महायुतीच्या भविष्यावर रोहित पवार यांचं मोठं वक्तव्य.