‘Rishabh Pant ला OUT करण्याची संधी सोडली, तर तो तुम्हाला…’ हताश झालेल्या इंग्लंडच्या कॅप्टनचे उदगार

मँचेस्टर वनडे मध्ये इंग्लंडचा संघ एकवेळ शानदार प्रदर्शन करत होता. त्यांनी 72 धावात भारताच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं होतं. पण त्यानंतर ऋषभ पंत (Rishabh pant) इंग्लंडच्या मार्गात अडथळा बनला.

'Rishabh Pant ला OUT करण्याची संधी सोडली, तर तो तुम्हाला...' हताश झालेल्या इंग्लंडच्या कॅप्टनचे उदगार
ऋषभ पंतImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 2:32 PM

मुंबई: मँचेस्टर वनडे मध्ये इंग्लंडचा संघ एकवेळ शानदार प्रदर्शन करत होता. त्यांनी 72 धावात भारताच्या चार फलंदाजांना माघारी धाडलं होतं. पण त्यानंतर ऋषभ पंत (Rishabh pant) इंग्लंडच्या मार्गात अडथळा बनला. डावखुऱ्या ऋषभने 113 चेंडूत नाबाद 125 धावा फटकावल्या. वनडे मधलं पहिलं शतक त्याने झळकावलं. पंतने पंड्यासोबत (Hardik pandya) मिळून पाचव्या विकेटसाठी 133 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी तोडण्याची इंग्लंडकडे एक चांगली संधी होती. पण टीमचा कॅप्टन जोस बटलरनेच चूक केली. पंत व्यक्तीगत 18 धावांवर खेळत असताना, बटलरने (Jos buttler) त्याला जीवदान दिलं. पंतची स्टम्पिंग करण्याची संधी वाया दवडली. त्यानंतर भारतीय विकेटकीपर फलंदाजांना इंग्लंडला सामन्यात परतण्याची संधीच दिली नाही. “पंत सारख्या खेळाडूला जीवदान देणं म्हणजे, पराभवाला निमंत्रण देण्यासारखं आहे” असं जोस बटलरने सामन्यानंतर मान्य केलं.

बटलरही पंतचा चाहता

“पंत एक शानदार खेळाडू आहे. तुम्ही त्याला दुसरी संधी दिली, तर तो तुम्हाला धक्का देणार. ऋषभ पंत एक निर्भीड खेळाडू आहे. प्रत्येक फॉर्मेट मध्ये तो कमालीचं क्रिकेट खेळतो. तो आपल्या पद्धतीची बॅटिंग करतो. त्यामुळेच टीम इंडिया त्याला संधी देते” असं बटलर म्हणाला.

पंतच शानदार प्रदर्शन

मँचेस्टर मध्य ऋषभ पंत आपल्या करीयरमधली शानदार इनिंग खेळला. पंतने पहिल्यांदा शतक झळकावलं. त्याने 16 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने नाबाद 125 धावा फटकावल्या. महत्त्वाचं म्हणजे ऋषभ पंतने कठीण काळात ही कामगिरी करुन दाखवली. सेट झाल्यानंतर इंग्लिश गोलंदाजांवर हल्लाबोल केला. शतकानंतर त्याने डेविड विलीच्या एकाच षटकात पाच चौकार लगावले. कसोटी मालिका बरोबरीत सुटल्यानंतर भारताने इंग्लंड विरुद्धची टी 20 मालिका 2-1 अशी जिंकली. आता वनडे सीरीजही खिशात घातली. ऋषभ पंतला सामनावीर तर हार्दिक पंड्याला मालिकावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.