AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG, 3rd T20 Match: प्लेइंग 11 मध्ये पुन्हा एकदा बदल, नाणेफेकीनंतर कर्णधार श्रेयस म्हणाला…

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना होत आहे. या सामन्यात प्लेइंग 11 कशी असेल याबाबत चर्चा रंगली होती. अखेर यावर पडदा पडला आहे. कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेकीनंतर स्पष्ट काय ते सांगितलं.

IND vs ENG, 3rd T20 Match: प्लेइंग 11 मध्ये पुन्हा एकदा बदल, नाणेफेकीनंतर कर्णधार श्रेयस म्हणाला...
IND vs ENG, 3rd T20 Match: प्लेइंग 11 मध्ये पुन्हा एकदा बदल, नाणेफेकीनंतर कर्णधार श्रेयस म्हणाला...Image Credit source: BCCI
| Updated on: Jul 07, 2026 | 9:41 PM
Share

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील दोन सामन्यानंतर टीम इंडिया 0-1 ने पिछाडीवर आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. ही मालिका जिंकायची असल्यास भारताला काहीही करून सलग तीन सामने जिंकणं भाग आहे. त्यामुळे या सामन्यात कोणत्या प्लेइंग 11 सह उतरणार याची चर्चा रंगली होती. दुसऱ्या टी20 सामन्यात प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला होता. संजू सॅमसनला बसवून वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी दिली होती. आता मालिकेसाठी करो या मरोची स्थिती असताना पुन्हा एकदा प्लेइंग 11 मध्ये बदल करण्यात आला आहे. पण संजू सॅमसनला पुन्हा एकदा तिसऱ्या टी20 सामन्यातून वगळण्यात आलं आहे.  फक्त संघात एकच बदल केला गेला आहे. रवि बिष्णोईला बसवून प्रिन्स यादवला संधी दिली गेली आहे.

नाणेफेकीचा कौल टिम इंडियाच्या बाजूने लागला आणि कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करणार आहोत. ती एक छोटीशी अडचण होती, जी आपल्या नियंत्रणात नसते, पण मुलांचा उत्साह दांडगा आहे. प्रत्येक खेळाडू आयुष्यात अशा टप्प्यातून जातो. त्याच्यासाठी आणि संघासाठीही हा एक मोठा धडा आहे. खेळपट्टी पाहता मला वाटते की ती खूप सुंदर आहे. रवी बिश्नोईच्या जागी प्रिन्स यादव फलंदाजीला आला आहे.’

हॅरी ब्रुक म्हणाला की, ‘आम्ही द्विधा मनस्थितीत होतो, पण आम्ही प्रथम फलंदाजी केली असती. या संघासोबत खेळताना आपण सामन्यातून बाहेर पडलो आहोत, असे आम्हाला कधीच वाटत नाही. भारत आणि इतर कोणत्याही देशाविरुद्धचा प्रत्येक सामना महत्त्वाचा असतो. आम्हाला 2-0 अशी आघाडी घ्यायची आहे.’

दोन्ही संघांची प्लेइंग 11

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): फिलिप सॉल्ट, जोस बटलर (यष्टीरक्षक), हॅरी ब्रुक (कर्णधार), जेकब बेथेल, टॉम बँटन, सॅम करन, विल जॅक्स, लियाम डॉसन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, जोश टंग.

भारत (प्लेइंग इलेव्हन) : अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, तिलक वर्मा, अक्षर पटेल, हर्षित राणा, प्रिन्स यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे