AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तोंडावर गोड बोलला आणि गेम केला, कॅप्टन शुबमनकडून तिसऱ्या कसोटीतून या खेळाडूचा पत्ता कट

भारत आणि इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना लॉर्ड्सवर सुरु झाला आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने लागला आणि त्यांनी प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे. असं असताना भारताने संघात एक बदल केला आहे.

तोंडावर गोड बोलला आणि गेम केला, कॅप्टन शुबमनकडून तिसऱ्या कसोटीतून या खेळाडूचा पत्ता कट
तोंडावर गोड बोलला आणि गेम केला, कॅप्टन शुबमनकडून तिसऱ्या कसोटीतून या खेळाडूचा पत्ता कटImage Credit source: BCCI
| Updated on: Jul 10, 2025 | 3:42 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दोन सामने पार पडले आहेत. आतापर्यंत खेळलेल्या दोन सामन्यात 1-1 अशी बरोबरी आहे. त्यामुळे तिसरा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी तितकाच महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांनी त्यासाठी कंबर कसली आहे. भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची संघात एन्ट्री झाली आहे. यासाठी संघातून वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचा पत्ता कापला आहे. प्रसिद्ध कृष्णा मागच्या दोन सामन्यात खूपच महागडा ठरला होता. एजबेस्टन कसोटीत तर त्याला विकेटही मिळाली नाही. त्यामुळे त्याला तिसऱ्या सामन्यात बसवलं जाणार हे सहाजिकच होतं. आता बुमराहसोबत आकाश दीप आणि मोहम्मद सिराज दिसणार आहे. तर रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही संघात स्थान देण्यात आलं आहे.

शुबमन गिल म्हणाला की, ‘आज सकाळपर्यंत मी गोंधळलेला होतो की काय करावे. मी प्रथम गोलंदाजी केली असती. पहिल्या सत्रात गोलंदाजांसाठी काहीतरी असेल. सर्वांनीच त्यात भर घातली आणि चर्चा याच विषयावर होती. गोलंदाजांना आत्मविश्वास वाटत आहे, एजबेस्टन विकेटवर 20 बळी घेणे सोपे नव्हते. मला खूप छान वाटत आहे, एक फलंदाज म्हणून तुम्ही परिस्थितीच्या मध्यभागी राहून फलंदाजी करण्याची अपेक्षा करता. आमच्याकडे एक बदल आहे. प्रसिद्धऐवजी बुमराह संघात आला आहे. लॉर्ड्सवर टीम इंडियाची कामगिरी काही खास नाही. आतापर्यंत खेळलेल्या 19 सामन्यांपैकी फक्त 3 सामन्यात विजय मिळवला आहे.  कपिल देव, महेंद्र सिंह धोनी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वात विजय मिळवला आहे. आता शुबमन गिलकडे विक्रमाची संधी आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, शोएब बशीर.

Follow Us
विद्यार्थिनींचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
नागपूरमधील विद्यार्थिनींचा संघर्ष: बस सेवेच्या मागणीचा अभिजीत दिपके यांनी शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल
मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत: मुंबईकडे येणाऱ्या लोकल 25 ते 30 मिनिटे उशिराने
राज ठाकरंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, काय घडलं?
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली अन् अचानक रद्द केली, असं काय घडलं?
राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
संजय राऊत हे दलालांचे नेते: नवनाथ बन यांचा जोरदार पलटवार
मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे...
ताडदेव गृहप्रकल्प वाद; मांसाहारींना घर नाकारल्याने ब्रोकर भावेश कावरेवर टीकेची झोड, मनसे नेते थेट...
अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा विलंबावर पलटवार
संसदीय वादंग: अमित शाह यांचा चर्चेचा प्रस्ताव, खरगे यांचा १९ दिवसांच्या विलंबावर पलटवार
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड