IND vs ENG : कॅप्टन सूर्या पराभवानंतर तिघांचा पत्ता कापणार! प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळणार?
India vs England 4th T20 Playing XI : टीम इंडियाची राजकोटमधील पराभवामुळे विजयी हॅटट्रिक हुकली. तसेच टीम इंडियाच्या या पराभवामुळे मालिका विजयाची प्रतिक्षा लांबली. त्यामुळे आता कॅप्टन सूर्यकुमार यादव चौथ्या सामन्यात प्लेंइग ईलेव्हनमध्ये काही बदल करु शकतो.

टीम इंडियाला राजकोटमध्ये 28 जानेवारीला झालेल्या तिसऱ्या टी 20i सामन्यात पराभूत व्हावं लागलं. इंग्लंडने यासह विजयाचं खातं उघडलं. इंग्लंडने 9 विकेट्स गमावून 171 धावा केल्या. तर टीम इंडियाला प्रत्युत्तरात 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 145 धावा केल्या. टीम इंडिया विजयी आव्हानापासून 26 धावांनी दूर राहिली. इंग्लंड यानंतरही मालिकेत 1-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे. मात्र इंग्लंडचं मालिकेतील आव्हान कायम आहे. उभयसंघातील चौथा सामना हा 31 जानेवारीला होणार आहे. हा सामना पुण्यात होणार आहे. टीम इंडियाचे टॉप ऑर्डरमधील फलंदाज अपयशी ठरल्याने कॅप्टन सूर्यकुमार प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करणार, यात काहीच शंका नाही.
टीम इंडियाकडे राजकोटमध्ये सलग तिसऱ्या विजयासह मालिका जिंकण्याची चांगली संधी होती. तर इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ अशी स्थिती होती. मात्र इंग्लंडने सलग 2 पराभवानंतर पलटवार केला आणि टीम इंडियाला पराभूत केलं. टीम इंडियाचे फलंदाज तिसऱ्या सामन्यात अपयशी ठरले. त्यामुळे सूर्यकमार चौथ्या सामन्यातून कोणाला डच्चू देऊ शकतो? हे जाणून घेऊयात.
कुणाला संधी कुणाला डच्चू?
अर्शदीप सिंह याला तिसऱ्या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली होती. अर्शदीपच्या जागी प्लेइंग ईलेव्हनमध्ये मोहम्मद शमी याचा समावेश करण्यात आला होता. शमीने आपण फिट असल्याचं दाखवून दिलं. मात्र त्याला विकेट घेण्यात अपयश आलं. मात्र त्यानंतरही शमीला चौथ्या सामन्यासाठी संधी मिळू शकते. तसेच अर्शदीपचं कमबॅक होऊ शकतं. अर्शदीपसाठी एका स्पिनरला बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. रवी बिश्नोई याचा पत्ता कट होऊ शकतो.
हार्दिक-जुरेल आऊट?
तसेच आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर ऑलराउंडर हार्दिक पंड्या याला विश्रांती दिली जाऊ शकते. हार्दिकच्या जागी मुंबईकर ऑलराउंडर शिवम दुबे याचा समावेश केला जाऊ शकतो. तसेच रिंकु सिंहला दुखापतीमुळे दुसऱ्या आणि तिसर्या सामन्याला मुकावं लागलं. मात्र आता तो कमबॅक करणार असल्याचं म्हटंल जात आहे. त्यामुळे रिंकु सिंग आल्यास ध्रुवला बेंचवर बसावं लागेल.
चौथ्या टी 20i सामन्यासाठी टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी आणि वरुण चक्रवर्ती.
