AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : टीम इंडियात उभी फूट? गौतम गंभीरने सर्वच सांगितलं, म्हणाला..

India Head Coach Gautam Gambhir on Dressing Room Rumours : टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वकाही ठीक नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांआधी सोशल मीडियावर रंगली होती. त्यावरुन टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरने सर्व काही स्पष्ट केलं आहे.

Team India : टीम इंडियात उभी फूट? गौतम गंभीरने सर्वच सांगितलं, म्हणाला..
gautam gambhir team indiaImage Credit source: PTI
| Updated on: Feb 03, 2025 | 1:06 PM
Share

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेआधी इंग्लंड क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर आहे. इंग्लंडचा टीम इंडियाविरुद्धच्या टी 20i मालिकेत पराभव झाला. टीम इंडियाने रविवारी 2 फेब्रुवारीला इंग्लंडवर पाचव्या आणि अंतिम सामन्यात 150 धावांनी विजय मिळवत मालिका 4-1 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. आता त्यांनतर उभयसंघात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. एकूण 3 सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे.तर जोस बटलर याच्याकडे एकदिवसीय संघाचं कर्णधारपद आहे.

रोहितसेनेची बॉर्डर गावसकर ट्रॉफीनतंर ही मायदेशातील पहिली आणि एकदिवसीय मालिका असणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना टीम इंडियात उभी फूट पडली असल्याचं म्हटलं जात होतं. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये सर्वकाही ठीक नसल्याचं म्हटलं जात होतं. आता सर्व चर्चेवर अखेर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पूर्णविराम लावला आहे. गंभीरने याबाबत काय सांगितलं? जाणून घेऊयात.

गौतम गंभीरने सर्वच सांगितलं

“हे खेळाडू एकमेकांसह खूप क्रिकेट खेळले आहेत. एक महिन्याआधी अशा अनेक प्रकारच्या अफवा होत्या”, असं गंभीर हसत हसत म्हणाला. जेव्हा टीम इंडियाचं कामगिरी निराशाजनक असते, तेव्हा ड्रेसिंग रुमबाबत असं काही तरी उलटसुलट म्हटलं जातं. मात्र जसं आमच्या बाजूने सर्व काही घडायला सुरुवात होते, तेव्हा सर्वकाही नियमित होतं”, असं गौतम गंभीर याने म्हटलं. इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या टी 20i सामन्याचं आयोजन हे मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. टीम इंडियाच्या विजयानंतर अभिनव मुकुंद, पार्थिव पटेल आणि केविन पीटरसन या त्रिकुटाने गंभीरसह संवाद साधला. गंभीरला या दरम्यान ड्रेसिंग रुमबाबत प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्याने वरील उत्तर दिलं.

वनडे सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

वनडे सीरिजसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह, यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि हर्षित राणा (बुमराहचा बॅकअप).

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.