IND vs ENG : टी 20i मालिकेआधी टीम मॅनजमेंटचा मोठा निर्णय, या खेळाडूकडे मोठी जबाबदारी
India vs England T20i Series : इंग्लंडच्या भारत दौऱ्याला 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. त्याआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने मोठी घोषणा केली आहे.

टीम इंडिया अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आता मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. टीम इंडिया मायदेशात इंग्लंड विरुद्ध टी 20i आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. उभयसंघातील टी 20i मालिकेला बुधवार 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना हा कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये होणार आहे. या सामन्याच्या 24 तासांआधी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 2 मोठे निर्णय घेतले आहेत. इंग्लंडने 25 वर्षीय युवा खेळाडूची उपकर्धारपदी नियुक्ती केली आहे. तसेच प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 25 वर्षीय हॅरी ब्रूक याची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे. इंग्लंड क्रिकेट या एक्स अकाउंटवरुन याबाबतची माहिती दिली आहे. हॅरी आता इंग्लंडचं वनडे आणि टी 20I फॉर्मेटमध्ये (व्हाईट बॉल क्रिकेट) उपकर्णधारपद भूषवणार आहे. हॅरीने आतापर्यंत 20 वनडे आणि 39 टी 20i सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं आहे.ब्रूकने याआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचं नेतृत्व केलं होतं. इंग्लंडला ही मालिका गमवावी लागली होती. ऑस्ट्रेलियाने या मालिकेत 3-2 अशा फरकाने विजय मिळवला होता. मात्र ब्रूकने त्या मालिकेत 300 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या.
दरम्यान इंग्लंडने त्यासह सलामीच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनची घोषणा केली आहे. जोफ्रा आर्चर आणि मार्क वूड या दोघांचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच जोस बटलर इंग्लंडचं नेतृत्व करणार आहे.
हॅरी ब्रूक इंग्लंडचा उपकर्णधार
Introducing our new men’s white-ball vice captain, @Harry_Brook_88! 👏 pic.twitter.com/NmBWVPZSng
— England Cricket (@englandcricket) January 20, 2025
पहिल्या टी 20i सामन्यासाठी इंग्लंड प्लेइंग ईलेव्हन : जॉस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक (उपकर्णधार), फिल सॉल्ट, बेन डकेट, लियाम लिविंगस्टोन, जेकब बेथल, जेमी ओव्हरटन, गस एटकीन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि मार्क वूड.
इंग्लंडविरुद्धच्या टी 20i मालिकेसाठी भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अक्षर पटेल (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंह, नीतीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि वॉशिंगटन सुंदर.
