AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मँचेस्टर कसोटीत एकाच दिवसात दोन वेळा टीम इंडिया ऑलआऊट, वेगवाने गोलंदाजाने घेतले होते 9 विकेट

IND vs ENG 4th Test : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये होणार आहे. हा कसोटी सामना भारतासाठी खूपच महत्त्वाचा आहे. भारतासाठी हा सामना करो या मरोची लढाई आहे. पण या मैदानावरील भारताची कामगिरी निराशाजनक आहे. भारताला पहिला पराभव या मैदानात 72 वर्षांपूर्वी मिळाला होता.

मँचेस्टर कसोटीत एकाच दिवसात दोन वेळा टीम इंडिया ऑलआऊट, वेगवाने गोलंदाजाने घेतले होते 9 विकेट
मँचेस्टर कसोटीत एकाच दिवसात दोन वेळा टीम इंडिया ऑलआऊट, वेगवाने गोलंदाजाने घेतले होते 9 विकेटImage Credit source: Getty Images
| Updated on: Jul 19, 2025 | 6:04 PM
Share

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना मँचेस्टरमध्ये 23 जुलैपासून सुरु होणार आहे. हा सामना भारताला काही मालिका वाचवण्यासाठी काहीही करून जिंकावा लागणार आहे. पण मँचेस्टरचं मैदान भारतीय संघासाठी कधीच लाभलं नाही. आतापर्यंत या मैदानात भारताने एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. आतापर्यंत खेळलेल्या 9 कसोटी सामन्यापैकी 4 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर पाच सामने ड्रॉ झाले आहेत. या मैदानावर भारताला पहिल्यांदा 73 वर्षांपूर्वी पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. तेव्हा इंग्लंडच्या एका गोलंदाजाने भारतीय फलंदाजांची दाणादाण उडवून दिली होती. हा सामना 17 जुलै 1952 रोजी झाला होता. या सामन्यात भारतीय संघाची पार वाट लागली होती. भारतीय संघाचा या मैदानावर तिसरा आणि स्वातंत्र्यानंतर भारतीय संघाचा हा पहिला कसोटी सामना होता. 17 जुलैला सुरु झालेला सामना 19 जुलैला संपला. पावसामुळे इंग्लंडने या मैदानात दोन दिवसांपेक्षा जास्त बॅटिंग केली होती आणि पहिल्या डावात 347 धावा करून डाव घोषित केला होता.

तिसऱ्या दिवशी म्हणजेच 19 जुलैला टीम इंडियाला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या सामन्यात वेगवान गोलंदाज फ्रेड ट्रूमॅनने भेदक गोलंदाजीचं प्रदर्शन केलं. उजव्या हाताने गोलंदाजी करणारा वेगवान गोलंदाज ट्रूमॅनन तेव्हा फक्त 21 वर्षांचा होता. संघात नव्यानेच आला होता. पण त्याने या मालिकेतील दोन सामन्यात 15 विकेट घेतल्या होत्या. या सामन्यातील पहिल्या डावात त्याने एकट्याने भारताच्या 8 फलंदाजांना तंबूत पाठवलं. पहिल्या डावात भारताचा डाव 58 धावांवर आटोपला आणि फॉलोऑनची नामुष्की ओढावली.

पहिल्या डावातील धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय दुसऱ्यांदा फलंदाजीला उतरला. या डावातही भारतीय फलंदाजांनी नांगी टाकली. या डावात ट्रूमॅनला फक्त एक विकेट मिळाली. पण एलेक बेडसरने 5 आणि टोनी लॉकने 4 विकेट घेतल्या. या दोघांनी मिळून भारताचा दुसरा डावा 82 धावांवर संपवला. त्यामुळे भारताचे दोन्ही डाव एका दिवसात संपले. भारताने 20 विकेट गमवून 140 धावा केल्या. यासह इंग्लंडने हा सामना एक डाव आणि 207 धावांनी जिंकला.

काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड
काय तो विजय... सगळं कसं ओक्के! शहाजीबापू पाटलांनी सांगोल्यात राखला गड.
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?
निकालादरम्यान जामखेडमध्ये अचानक मतमोजणी थांबवली, कारण काय?.
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी
बीडमध्ये दादांना धक्का तर भाजपचं वर्चस्व, 2 नगरसेवकपदाचे उमेदवार विजयी.
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर
संजय गायकवाड यांची पत्नी आघाडीवर, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर.
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर
भाजपला मोठा धक्का, फुलंब्रीमध्ये उद्धव ठाकरे यांची सेना आघाडीवर.
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर
साताऱ्यातील मतमोजणीत दोन्ही राजेंना धक्का तर 3 अपक्ष आघाडीवर.
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार
मतमोजणीत महायुती आघाडीवर, भाजप नंबर 1, 100 चा आकडा पार.
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला
बारामतीत अजित पवार vs शरद पवार संघर्ष, दोन्ही गटांची प्रतिष्ठा पणाला.
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला
राजगुरुनगरमध्ये वळसे-पाटील अन् अमोल कोल्हेंची प्रतिष्ठा पणाला.
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा
कणकवलीत राणे बंधूंमध्ये चुरस, कोण मारणार बाजी? निकालाची प्रतीक्षा.