AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG : रवींद्र जडेजाने वारंवार तसंच घडत असल्याने घेतला मोठा धडा, सांगितलं की…

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून सुरु होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ सज्ज आहेत. इंग्लंडने प्लेइंग इलेव्हनही जाहीर केली आहे. तर दुसरीकडे, रवींद्र जडेजाने दुखापतीतून सावरत कमबॅक केलं आहे. असं असताना रवींद्र जडेजाने वारंवार होणाऱ्या दुखापतीतून सावरण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे.

IND vs ENG : रवींद्र जडेजाने वारंवार तसंच घडत असल्याने  घेतला मोठा धडा, सांगितलं की...
IND vs ENG : तिसऱ्या कसोटीपासून रवींद्र जडेजाचा मास्टर प्लान, तसं होऊच नये म्हणून उचललं मोठं पाऊल
| Updated on: Feb 14, 2024 | 5:02 PM
Share

मुंबई : भारत इंग्लंड यांच्यात तिसरा कसोटी सामना गुरुवारपासून राजकोट येथे सुरु होणार आहे. या सामन्यातील विजय दोन्ही संघासाठी महत्त्वाचा आहे. या सामन्यातून रवींद्र जडेजा पुनरागमन करणार आहे. दुसऱ्या कसोटीमध्ये रवींद्र जडेजा दुखापतीमुळे खेळला नव्हता.  त्याच्या अनुपस्थितीतही सामना जिंकण्यात टीम इंडियाला यश आलं होतं. असं असलं तरी रवींद्र जडेजाची उणीव भासली होती. आता तिसऱ्या कसोटीपासून रवींद्र जडेजाने महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. दुखापत होऊच नये यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. “वारंवार दुखापत होणं निराशाजनक आहे. पण सध्या क्रिकेटचे भरपूर सामने होत असून तेच डोक्यात असतं. मी मैदानात फार काळ लपू शकत नाही. मी कोणत्याही फॉर्मेटमध्ये महत्त्वाच्या ठिकाणी उभा असतो. जखमी होण्याचं प्रमुख कारण तेच असावं. कारण चेंडू जास्तीत जास्त माझ्या जवळ येत असतो.”, असं रवींद्र जडेजाने सांगितलं.

“मी सामन्यात माझं 100 टक्के देऊ इच्छितो यात दुमत नाही. पण शारीरिक इजा होणार नाही याची काळजी घेईन. जेव्हा गरज नसेल तेव्हा उडी मारणार नाही. बस हाच एक प्लान आहे. मी याच्याबाबत जास्त विचार करत नाही. कारण असं यापूर्वीही झालं आहे.”, असं रवींद्र जडेजा याने सांगितलं. तिसऱ्या कसोटी सामना निर्णायक असणार आहे. तिसरा सामना जिंकल्यानंतर मालिका खिशात घालणं सोपं होईल. तर पराभूत झालेल्या संघाला कमबॅक करणं कठीण होईल.

“राजकोटमधील विकेट सपाट आणि टणक आहे. ही खेळपट्टी कशी तयार केली आहे यावर सर्वकाही अवलंबून आहे. विकेट चांगली दिसत आहे. इथली विकेट प्रत्येक सामन्यात वेगळी भासते. कधी पाटा विकेटवर गोलंदाजी करणं कठीण होतं. तर कधी फिरकीला अनुकूल असते. कधी कधी दोन दिवस काहीच होत नाही. त्यानंतर चेंडू वळायला लागतो. सुरुवातीला विकेट चांगली राहील. त्यानंतर फिरकीला मदत मिळेल.”, असं रवींद्र जडेजाने सांगितलं.

तिसऱ्या कसोटी सामन्यात रजत पाटीदारला पुन्हा संधी मिळणार की, सरफराज आणि ध्रुव जुरेलला पदार्पणाची संधी मिळते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. रवींद्र जडेजाने यावर भाष्य करत सांगितलं की, “नवख्या खेळाडूंना प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याचा अनुभव गाठीशी आहे. त्यांना कसोटी क्रिकेट कसं खेळायचं हे माहिती आहे.”

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.