दुसरी कसोटी जिंकल्यावरही ‘या’ खेळाडूंना बाहेरचा रस्ता?, टीम मॅनेजमेंटम मोठा निर्णय घेणार!

IND vs ENG 3rd TEST | टीम इंडियाने इंग्लंडविरूद्ध दुसरी कसोटी जिंकत मालिकेत बरोबरी केली आहे. मात्र तरीसुद्धा टीम इंडियामधील काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. कोण आहेत ते खेळाडू जाणून घ्या.

दुसरी कसोटी जिंकल्यावरही 'या' खेळाडूंना बाहेरचा रस्ता?, टीम मॅनेजमेंटम मोठा निर्णय घेणार!
Follow us
| Updated on: Feb 08, 2024 | 4:33 PM

मुंबई : टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामधील पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. पाच सामन्यांच्या मालिकेमधील दोन सामने झाले आहेत. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकला असून मालिका बरोबरीत साधली आहे. आता तिसरा कसोटी सामना गुजरातमधील राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. संघात नेमके कोणते बदल होऊ शकतात जाणून घ्या.

टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना जिंकला असला तरीसुद्धा संघात बदल होणार हे निश्चित आहे. कारण हा सामना जिंकला असला तरी काही खेळाडूंना प्लेइंग 11 मधून बाहेर काढण्यात येणार आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये के. एल. राहुल आणि रविंद्र जडेजा माघारी परतणार असल्याची माहिती समजत आहे. दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडले होते. या खेळाडूंच्या जागी ज्यांना संधी मिळाली त्यांनीही काही चमकदार कामगिरी केली नाही.

दोन युवा खेळाडू दुसरे तिसरे कोणी नसून रजत पाटीदार आणि मुकेश कुमार आहेत. तीन सामन्यांसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार आहे. तिसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजसुद्धा कमबॅक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.  शुबमन गिल याचंही स्थान धोक्यात होतं मात्र दुसऱ्य कसीटीमध्ये शतकी खेळी करत गिलने टीकाकारांना उत्तर दिलं. त्यामुळे आता रजत पाटीदार याला डच्चू मिळण्याची जास्त शक्यता आहे. बीसीसीआय  येत्या शुक्रवारपर्यंत कसोटी स्क्वॉड घोषित करण्याची जास्त शक्यता आहे.

दरम्यान, विराट कोहली तिसऱ्या आणि चौख्य कसोटीलाही मुकणार असल्याची चर्चा होत आहे. अनुष्का आणि विराट आणखी एकदा आई-बाबा होणार आहेत. कोहलीपाठोपाठ आता जसप्रीत बुमराह याच्या खेळण्याबाबत शंका आहे. जसप्रीत  बुमराहला दुसऱ्या  सामन्यामध्ये सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं होतं.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.