AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC 2025 : भारताने तिसरा कसोटी सामना जिंकताच ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घेतली मोठी झेप

भारताने तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ४३४ धावांनी दारूण पराभव केला आहे. या विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयी टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मागे सारत गुणतालिकेत दुसरं स्थान गाठलं आहे. आता चौथा कसोटी सामना जिंकल्यास टीम इंडियाला पहिलं स्थान गाठता येईल. चला जाणून घेऊयात गुणतालिकेतील फरक...

WTC 2025 : भारताने तिसरा कसोटी सामना जिंकताच ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घेतली मोठी झेप
WTC 2025 : इंग्लंडला तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारताच टीम इंडियाला फायदा, ऑस्ट्रेलियाला टाकलं मागे
| Updated on: Feb 18, 2024 | 5:28 PM
Share

मुंबई : पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना भारताने आपल्या खिशात घातला आहे. इंग्लंडला ४३४ धावांनी पराभूत करत मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यातील विजयासह टीम इंडियाची विजयी टक्केवारी वाढली आहे. तसेच गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. न्यूझीलंडचा संघाने आतापर्यंत चार पैकी ३ सामन्यात विजय मिळवला आहे. तर एक सामना गमावला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी ७५ असून पहिल्या स्थानी आहे. तर भारताने ७ पैकी ४ सामने जिंकत, २ सामन्यात पराभवाचं तोंड पाहात आणि एक सामना ड्रॉ करत गुणतालिकेत विजयी टक्केवारी ५९.५२ इतकी आहे. त्यामुळे दुसऱ्या स्थानी आहे. दुसरीकडे, भारताला दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात दोन गुणांची पेनल्टी बसली होती. त्यामुळे विजयी टक्केवारी दोन गुणांनी घटली आहे. अन्यथा भारताचे गुण ६१.५२ इतके असते. ऑस्ट्रेलियाने एकूण १० कसोटी सामने खेळले आहेत. त्यात ६ सामन्यात विजय आणि ३ सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर एक सामना ड्रॉ झाला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयी टक्केवारी ५५ सह तिसऱ्या स्थानी आहे.

बांगलादेशने एकूण दोन कसोटी सामने खेळले आहेत. त्यात एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी ५० असून चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानने एकूण ५ कसोटी सामने खेळले आहेत. यात २ सामन्यात विजय आणि तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. तर स्लो ओव्हर रेटसाठी दोन गुणांची पेनल्टी बसली आहे. त्यामुळे ३६.६६ गुणांसह पाचव्या स्थानी आहे.

wtc_2025 (2)

वेस्ट इंडिजने ४ पैकी एका सामन्यात विजय, तर दोन सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ केला आहे.त्यामुळे विजयी टक्केवारी ३३.३३ राहिली असून सहाव्या स्थानी आहे. इंग्लंडला सर्वाधिक फटका बसला आहे. इंग्लंडने एकूण ७ सामने खेळले असून ३ सामन्यात विजय, ३ सामन्यात पराभव आणि एक सामना ड्रॉ झाला आहे. तसेच १९ गुणांची पेनल्टी बसली आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी २५ असून सातव्या स्थानी आहे.

दक्षिण अफ्रिकेने एकूण ४ सामने खेळले असून ४ पैक एका सामन्यात विजय आणि ३ सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. विजयी टक्केवारी २५ सह आठव्या स्थानी आहे. तर श्रीलंकेने आतापर्यंत दोन कसोटी सामने खेळले असून दोन्ही सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. त्यामुळे विजयी टक्केवारी शून्य असून सर्वात शेवटच्या स्थानी आहे.

Follow Us
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा...
दुष्काळाच्या मुद्द्यावरून राजकीय वाद; फडणवीसांच्या घोषणेवर ठाकरेंचा पलटवार!
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या...
जसंच्या तसं उभारलं मंदिर! मालेगावच्या सावता मंडळातील गणेशोत्सवाच्या देखाव्याने वेधलं लक्ष
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं..
गुलाबराव पाटलांचा विरोधकांवर निशाणा, दुष्काळ आणि शिवसेना फुटीवर मोठं वक्तव्य
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खं...
गोंदियातील या अनोख्या गणपती देखाव्याची देशभर चर्चा, अख्खंच्या आख्खं 80s चं दशक....
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
मोठी बातमी! दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना... उद्धव ठाकरेंनी अखेर भूमिका मांडली
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र अगामी सुनावणी थेट...