IndvsNZ, 2nd ODI : रोहित शर्माचं अर्धशतक, टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 8 विकेट्सने दणदणीत विजय

टीम इंडियाने रायपूरमध्ये न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने 2-0 अशा फरकाने मालिका जिंकली आहे.

IndvsNZ, 2nd ODI : रोहित शर्माचं अर्धशतक, टीम इंडियाचा न्यूझीलंडवर 8 विकेट्सने दणदणीत विजय
Follow us
| Updated on: Jan 21, 2023 | 6:40 PM

रायपूर : टीम इंडियाने न्यूझीलंडवर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी 109 धावांचे माफक आव्हान दिले होते. हे आव्हान भारतीय संघाने 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाकडून कॅप्टन रोहित शर्माने सर्वाधिक 51 धावा केल्या. तर शुबमन गिल याने नाबाद 40 धावांचं योगदान दिलं. या विजयासह टीम इंडियाने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशा एकतर्फी फरकाने मालिकाही जिंकली आहे.

रोहित आणि शुबमन व्यतिरिक्त विराट कोहली याने 11 धावा केल्या. तर इशान किशन याने नाबाद 8 धावा केल्या. न्यूझीलंडकडून हेनरी शिपले आणि मिचेल सँटनर या दोघांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

शुबमन आणि रोहित ही टीम इंडियाची सलामी जोडी 109 धावांच्या विजयी आव्हानासाठी मैदानात आली. कॅप्टन रोहितने सुरुवातीपासून तडाखेदार बॅटिंग सुरु ठेवली. यो दोघांनी 72 धावांची सलामी भागीदारी केली.

हे सुद्धा वाचा

रोहितने या दरम्यान अर्धशतक ठोकलं मात्र यानंतर रोहित 51 धावा करुन आऊट झाला. रोहितने या खेळीत 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले.तर शुबमन याने 53 बॉलमध्ये नाबाद 40 धावांची खेळी केली. या खेळीत शुबमनने 6 फोर ठोकले.

त्याआधी टीम इंडियाने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी न्यूझीलंडचा 108 धावांवर गाशा गुंडाळला. भारतीय गोलंदाजांपुढे न्यूझीलंडच्या फलंदाजांना टीकता आलं नाही. न्यूझीलंडकडून ग्लेन फिलिप्सने सर्वाधिक 36 धावांची खेळी केली. मिचेल सँटनरने 27 आणि मायकल ब्रेसवेलने 22 धावा केल्या. या व्यतिरिक्त 7 फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. तर एक फलंदाज भोपळा न फोडता माघारी परतला.

टीम इंडियाकडून मोहम्मद शमी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. हार्दिक आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने प्रत्येकी 2 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), फिन एलन, डेवन कॉन्वे, हेनरी निकोल्स, डेरले मिचेल, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सॅंटनर, हेनरी शिप्ले, लॉकी फर्ग्यूसन आणि ब्लेयर टिकनेर.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.