AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : टीम इंडियात वनडे सीरिजसाठी या खेळाडूची अचानक एन्ट्री, Bcciची घोषणा

India vs New Zealand Odi Series 2026 : बीसीसीआय निवड समितीला न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याआधी नाईलाजाने भारतीय संघात बदल करावा लागला आहे. भारताच्या प्रमुख खेळाडूला दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर व्हावं लागलंय.

IND vs NZ : टीम इंडियात वनडे सीरिजसाठी या खेळाडूची अचानक एन्ट्री, Bcciची घोषणा
Team India Huddle TalkImage Credit source: @imkuldeep18 x account
| Updated on: Jan 11, 2026 | 12:12 PM
Share

टीम इंडियाला नववर्षातील पहिल्या एकदिवसीय सामन्याआधी मोठा झटका लागला. उभयसंघातील पहिला सामना 11 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी भारतीय संघाचा अनुभवी विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत याला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर व्हावं लागलं आहे. त्यामुळे भारताला मोठा फटका बसला आहे. त्यानंतर आता बीसीसीआयने मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआयने पंतच्या जागी एकदिवसीय मालिकेसाठी युवा खेळाडूचा भारतीय समावेश केला आहे. बीसीसीआयने पंतच्या जागी ध्रुव जुरेल याला संधी दिली आहे. बीसीसीआयने प्रसिद्धीपत्रकाद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे आता ध्रुवला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी मिळणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

ऋषभ पंत याला काय झालं?

टीम इंडिया शनिवारी 10 जानेवारीला सराव करत होती.  ऋषभ पंत याला बॅटिंगचा सराव करताना पोटाच्या उजव्या बाजूला अचानक त्रास जाणवू लागला. त्यामुळे क्षणाचा विलंब न करता पंतवर वैदकीय उपचार करण्यात आले. पंतला नक्की काय झालंय हे जाणून घेण्यासाठी एमआरआय करण्यात आला. त्यानंतर पंतला साईड स्ट्रेन झाल्याचं स्पष्ट झालं, अशी माहिती बीसीसीआयकडून देण्यात आली आहे.

पंतला मालिकेच्या काही तासांआधी झालेल्या दुखापतीमुळे मालिकेतून माघारी घ्यावी लागली. त्यामुळे ध्रुवला संधी मिळाली आहे. ध्रुव काही आठवड्यांआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या एकदिवसीय मालिकेचा भाग होता.

ध्रुवला प्रतिक्षा पदार्पणाची

ध्रुवने आतापर्यंत भारतीय संघाचं 9 कसोटी आणि 4 टी 20i सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र ध्रुवला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली नाहीय. त्यामुळे ध्रुवला या मालिकेत पदार्पणाची प्रतिक्षा असणार आहे.

ध्रुवने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 2025-2026 या मोसमात उत्तर प्रदेशसाठी 7 डावात 93 च्या कडक सरासरीने 558 धावा केल्या आहेत. ध्रुवने या दरम्यान 2 शतकं आणि 4 अर्धशतकं झळकावली आहेत.ध्रुवने या खेळीसह उतर प्रदेशला उपांत्य पूर्व फेरीत पोहचवण्यात प्रमुख भूमिका बजावली.

ध्रुव जुरेलचा एकदिवसीय मालिकेसाठी समावेश

न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारताचा सुधारित संघ : शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, यशस्वी जायसवाल, केएल राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, वॉश‍िंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसि कृष्णा, कुलदीप यादव, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), नीतीश कुमार रेड्डी आणि अर्शदीप सिंह.

57 मधले 17 नगरसेवक पळून गेले! एकनाथ खडसेंची विरोधकांवर टीका
57 मधले 17 नगरसेवक पळून गेले! एकनाथ खडसेंची विरोधकांवर टीका.
कटात सहभागी होऊ नका! संजय राऊतांचे अंधेरीत तुफान भाषण
कटात सहभागी होऊ नका! संजय राऊतांचे अंधेरीत तुफान भाषण.
मुंबईसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध, जाहीरनाम्यात काय?
मुंबईसाठी महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध, जाहीरनाम्यात काय?.
भाजपला लाज का वाटत नाही? विजय वडेट्टीवारांचा घणाघाती सवाल
भाजपला लाज का वाटत नाही? विजय वडेट्टीवारांचा घणाघाती सवाल.
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा; संजय राऊत भाजपवर संतापले
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा; संजय राऊत भाजपवर संतापले.
दगडू सकपाळ यांचा शिवसेना प्रवेश, शिंदेंनी व्यक्त केल्या भावना
दगडू सकपाळ यांचा शिवसेना प्रवेश, शिंदेंनी व्यक्त केल्या भावना.
... याला जशास तसे उत्तर देईल; नितेश राणेंचा पलटवार
... याला जशास तसे उत्तर देईल; नितेश राणेंचा पलटवार.
नितेश राणेंच्या घराबाहेर सापडली अज्ञात बॅग! बॉम्बशोधक पथकाकडून तपास
नितेश राणेंच्या घराबाहेर सापडली अज्ञात बॅग! बॉम्बशोधक पथकाकडून तपास.
लाडक्या बहिणीला 1500 मिळणार; काँग्रेसच्या टीकेचा भाजपकडून खरपूस समाचार
लाडक्या बहिणीला 1500 मिळणार; काँग्रेसच्या टीकेचा भाजपकडून खरपूस समाचार.
बाळासाहेबांवरून फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपली!
बाळासाहेबांवरून फडणवीस आणि ठाकरेंमध्ये जुंपली!.