AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2021, IND vs PAK : आज पाकिस्तानची धुलाई पक्की, सरावादरम्यान विराट कोहलीचा चौकार-षटकारांचा पाऊस

विराट कोहलीने भारतीय गोलंदाजांची धुलाई केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानचा संघ टेन्शनमध्ये आहे. त्यांच्या गोलंदाजांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे म्हटले जात आहे.

T20 World Cup 2021, IND vs PAK : आज पाकिस्तानची धुलाई पक्की, सरावादरम्यान विराट कोहलीचा चौकार-षटकारांचा पाऊस
Virat Kohli
| Edited By: | Updated on: Oct 24, 2021 | 10:48 AM
Share

मुंबई : विराट कोहलीने भारतीय गोलंदाजांची धुलाई केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पाकिस्तानचा संघ टेन्शनमध्ये आहे. त्यांच्या गोलंदाजांमध्ये भीतीचे वातावरण आहे, असे म्हटले जात आहे, आणि असं का होणार नाही? ज्याने आपल्या गोलंदाजांना सोडले नाही, तो भारत-पाकिस्तानसारख्या हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानी गोलंदाजांना कसा सोडेल? विराटचा पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वीचा सरावादरम्यानचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. त्यावरुन फॅन्समध्ये अशीच काहिशी चर्चा आहे. (IND vs PAK, T20 World Cup 2021: Virat Kohli attack on Indian Bowlers before match, Net Practise VIDEO viral)

दुबईत टीम इंडियाच्या नेटमध्ये विराट कोहलीने हे काम केले आहे. कर्णधार कोहलीने संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करायला लावली आणि प्रत्येक गोलंदाजाची गोलंदाजी फोडून काढली. मग तो गोलंदाज कोणीही असो, तो भुवी असेल, अश्विन असेल. चाहर किंवा शार्दुल असेल, त्याने प्रत्येकाला अक्षरशः फोडून काढलं. त्याने काही पार्ट टाईम गोलंदाजांविरोधातही जोरदार फटकेबाजी केली.

UAE मधील विराटचे रेकॉर्ड्स

विराट कोहलीने UAE मध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 28 T20 डावांमध्ये 5 अर्धशतकांसह 778 ​​धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट बाबरपेक्षा चांगला आहे म्हणजेच 119.79 आणि फलंदाजीची सरासरी 33.82 आहे. यूएईमध्ये विराटचा सर्वोच्च टी-20 स्कोअर नाबाद 90 आहे. टी-20 च्या आंतरराष्ट्रीय खेळपट्टीवर विराट कोहली गेल्या 3 वर्षात सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. या कालावधीत त्याने 993 धावा केल्या आहेत. या बाबतीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने विराट कोहलीपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय टी 20 धावा केल्या आहेत. आता विराट कोहलीने ज्या पद्धतीने सराव केला आहे, नेटमध्ये आपल्या गोलंदाजांना ज्या पद्धतीने चोपून काढलं आहे, त्याच पद्धतीने टी-20 विश्वचषकाच्या खेळपट्टीवर त्याने विरोधी गोलंदाजांची धुलाई केली तर तो बाबर आझमला सहज मागे टाकू शकतो.

पाकिस्तानची टीम मजबूत : विराट

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया कशी असेल? कॅप्टन कोहली कोणत्या प्लेइंग इलेव्हनसोबत मैदानात उतरेल? हार्दिक पांड्या खेळणार की नाही? अशा अनेक प्रश्नांवर सध्या क्रिकेटविश्वात चर्चा सुरु आहेत. दरम्यान, यापैकी काही प्रश्नांची उत्तरं कर्णधार विराट कोहलीने दिली आहेत. त्याने शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी एका पाकिस्तानी पत्रकाराने विराटला भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत खेळवण्यात आलेल्या सामन्यांबाबत विचारले असता विराट म्हणाला की, “आम्ही पाकिस्तान विरोधात यापूर्वी काय खेळ केला, आम्ही त्यांना किती वेळा पराभूत केलंय, याचा आम्ही विचार केला नाही. आमचं लक्ष त्या दिवशीच्या खेळावर आहे. त्या मॅचची आम्ही चांगली तयारी करतो. पाकिस्तान ही चांगली टीम असून त्यांच्या विरोधात चांगली तयारी करुन खेळावं लागतं. आमचं लक्ष कामगिरीत सातत्य ठेवण्यावर असेल. पाकिस्तानची टीम मबबूत आहे. त्यांच्याकडे अनेक गेमचेंजर खेळाडू आहेत, जे कोणत्याही क्षणी मॅच पलटू शकतात.”

आयपीएलचा फायदा होईल

विराट म्हणाला, टी-20 क्रिकेटमध्ये क्लॅरिटी ऑफ थॉट हे खूप महत्वाचं असतं. तीन ते चार चेंडूमध्ये मॅच बदलते. गोलंदाजाच्या एका ओव्हरमध्ये हे चित्र बदलतं. आयपीएलमध्ये आम्ही जे क्रिकेट खेळलो त्याचा आम्हाला फायदा होईल, असं विराट कोहली म्हणाला.

व्हिडीओ पाहा

इतर बातम्या

India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, ‘या’ नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा

T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं

India vs Pakistan, T20 World Cup LIVE Streaming : जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येईल भारत- पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना

(IND vs PAK, T20 World Cup 2021: Virat Kohli attack on Indian Bowlers before match, Net Practise VIDEO viral)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.