IND vs PAK: “थोडी तरी लाज वाटू दे”, हरभजन कामरान अकमलवर संतापला, कारण काय?
Harbhajan Singh Angry On Kamran Akmal: हरभजन सिंह याने कामरान अकमलची चांगलीच लाज काढली आहे. हरभजनने पाकिस्तानच्या या माजी खेळाडूला त्याची जागा दाखवून दिली आहे.

टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत पाकिस्तानवर 6 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाचा पाकिस्तान विरुद्धचा टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील सातवा विजय ठरला. विजयासाठी दिलेल्या 120 धावांचा पाठलाग करायला आलेल्या पाकिस्तानला टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चांगलाच घाम फोडला. पाकिस्तानने आश्वासक सुरुवात केली. मात्र त्यांनतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी जोरदार कमबॅक करत पाकिस्तानच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावला. अर्शदीप सिंह याने टीम इंडियाकडून शेवटची अर्थात 20 वी ओव्हर टाकली. टीम इंडियाने पाकिस्तानला 113 धावांवर रोखलं. टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय ठरला. या सामन्याच्या काही तासानंतर आता वादाला तोंड फुटलं आहे.
पाकिस्तानचा माजी विकेटकीपर फलंदाज कामराम अकमल याने अर्शदीप सिंह याच्यावर केलेल्या टिप्पणीवरुन टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंह संतापला आहे. हरभजनने कामरानचा वादग्रस्त वक्तव्याचा व्हीडिओ एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रिट्वीट केला आहे. हरभजनने कामरानवर जाहीर संताप व्यक्त केला आहे. हरभजनन कामरानवर नक्की का संतापला? हे आपण जाणून घेऊयात.
कामरान अकमलने टीम इंडिया-पाकिस्तान सामन्यादरम्यान एका शोमध्ये कामरान अकमल एक्सपर्ट म्हणून सहभागी झाला होता. कामरानने या शोमध्ये अर्शदीप सिंगवर टिप्पणी केली. “अर्शदीप सिंह याला शेवटची ओव्हर टाकायची आहे. तसा तो रंगात दिसत नाही. तुम्हाला माहित आहे 12 वाजले आहेत” यानंतर कामरान हसतो. कामरानसह असलेले इतर एक्सपर्ट्स म्हणतात, “कुणा सिखला 12 वाजता द्यायला नको”. हरभजनने या मुद्दयावरुन संताप व्यक्त करत कामरानची लाज काढली आहे.
हरभजनचा संताप, म्हणाला..
Lakh di laanat tere Kamraan Akhmal.. You should know the history of sikhs before u open ur filthy mouth. We Sikhs saved ur mothers and sisters when they were abducted by invaders, the time invariably was 12 o’clock . Shame on you guys.. Have some Gratitude @KamiAkmal23 😡😡🤬 https://t.co/5gim7hOb6f
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) June 10, 2024
हरभजन सिंह संतापला
“लाज आहे तुझी, घाणेरडे तोंड उघडण्यापूर्वी इतिहास जाणून घ्या. आम्ही सिखांनी तुमच्या आई-बहिणींचा अपहरणकर्त्यांकडून बचाव केला. वेळ 12 वाजताची होती. लाज वाटली पाहिजे… थोडी कृतज्ञता दाखवा”, अशा शब्दात हरभजनने कामरानला सुनावलं आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन: रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत (विकटेकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग
पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन: बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान, उस्मान खान, फखर जमान, शादाब खान, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि मोहम्मद अमीर.