IND vs PAK: “आम्ही कुणा एका…”, रोहितची विराटबाबत रोखठोक प्रतिक्रिया, स्पष्टच म्हणाला
Rohit Sharma on Virat Kohli Ind vs Pak: रोहित शर्माने पाकिस्तान विरुद्ध सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत विराट कोहलीबाबत रोखठोक प्रतिक्रिया दिली. रोहित विराटबाबत काय म्हणाला व्हीडिओत पाहा.

आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना रविवारी 9 जून रोजी होणार आहे. या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. या सामन्याआधी टीम इंडियाचा कर्णधार आणि अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याने सहकारी विराट कोहली याच्याबाबत रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषद पार पडली. रोहितने या पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांची उत्तर दिली. रोहितने या दरम्यान विराटबाबतही प्रतिक्रिया दिली.
रोहित शर्मा काय म्हणाला?
“आम्ही कुणा एका खेळाडूवर विजयासाठी अवलंबून राहू शकत नाही. प्रत्येक खेळाडूला पुढे येऊन कामगिरी करावी लागेल. त्याने (विराट) बांगलागदेश विरुद्ध सराव सामना खेळला नाही. तसेच विराटला पहिल्या सामन्यात विशेष काही करता आलं नाही. मात्र आपल्या सर्वांना माहिती आहे की त्याच्याकडे अनुभवाचा खजाना आहे”, असं रोहितने म्हटलं. विराट बांगलादेश विरुद्ध सामन्याच्या एक दिवसआधीच न्यूयॉर्कमध्ये पोहचला होता. त्यामुळे विराट सराव सामना खेळणार नसल्याचं कॅप्टन रोहितने टॉसदरम्यान सांगितलं होतं. तसेच विराटला आयर्लंड विरुद्ध फक्त 1 धावच करता आली.
पाकिस्तान विरुद्ध ‘विराट’ कामगिरी
विराट कोहलीने आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध जोरदार बॅटिंग केली आहे, हे त्याच्या आकडेवारीवरुन सिद्ध होतं. विराटने 2022 च्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध 53 बॉलमध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 83 धावांची नाबाद विजयी खेळी साकारली होती. विकाटने आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध 5 सामन्यांमध्ये 308 धावा केल्या आहेत. विराटने या दरम्यान 5 अर्धशतक झळकावली आहेत.
रोहित शर्माची पत्रकार परिषद
टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
टी 20 वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान टीम : बाबर आजम (कप्तान), अबरार अहमद, आजम खान, फखर जमान, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास अफरीदी, मोहम्मद आमिर, मोहम्मद रिजवान, नसीम शाह, सईम अयूब, शादाब खान, शाहीन शाह अफ्रीदी आणि उस्मान खान.
