Ruturaj Gaikwad Century : 12 फोर-2 सिक्स, ऋतुराज गायकवाड याचं चाबूक शतक
Ruturaj Gaikwad Century : ऋतुराज गायकवाड याने रायपूरमध्ये जोरदार फटकबेाजी करत एकदिवसीय कारकीर्दीतील पहिलंवहिलं शतक झळकावलं. ऋतुराजने अवघ्या 77 बॉलमध्ये हे शतक पूर्ण केलं.

ऋतुराज गायकवाड याला दक्षिण आफ्रिका ए विरूद्धच्या वनडे सीरिजमध्ये केलेल्या कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात संधी देण्यात आली. निवड समितीने ऋतुराजवर विश्वास दाखवत त्याला एकदिवसीय संघात स्थान दिलं. मात्र ऋतुराजला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रांचीत 30 नोव्हेंबरला झालेल्या पहिल्या सामन्यात काही खास करता आलं नव्हतं. ऋतुराज पहिल्या सामन्यात आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला. मात्र ऋतुराजने रायपूरमध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकत धमाका केला आहे. ऋतुराजने अवघ्या 77 बॉलमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलंवहिलं शतक झळकावलं.
ऋतुराजने दक्षिण आफ्रिका ए विरुद्ध लिस्ट ए क्रिकेटमधील वनडे सीरिजमध्ये 1 शतकासह 200 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे ऋतुराजकडून रांचीत पहिल्या वनडेत मोठ्या खेळीची आशा होती. मात्र ऋतुराजला दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ऋतुराज रांचीत 8 धावांवर आऊट झाला होता. मात्र ऋतुराजने रायपूरमध्ये शतक झळकावत टीम मॅनेजमेंटचा विश्वास सार्थ ठरवला.
ऋतुराजची अर्धशतकानंतर फटकेबाजी
ऋतुराज त्याच्या खेळीतील पहिल्याच बॉलवर आऊट होता होता वाचला. त्यानंतर ऋतुराजने कमाल केली. ऋतुराजने मैदानात चौफेर फटकेबाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. ऋतुराजने अवघ्या 52 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलं. ऋतुराजने अर्धशतकादरम्यान संयमीपणा दाखवला. त्यानंतर ऋतुराजने गिअर बदलला. ऋतुराजने पहिल्या 40 बॉलमध्ये 38 धावा केल्या. त्यानंतर ऋतुराजने पुढील 40 बॉलमध्ये 67 रन्स केल्या. ऋतुराजने अर्धशतक ते शतक अवघ्या 25 बॉलमध्ये पूर्ण केलं. ऋतुराजने अशाप्रकारे 77 बॉलमध्ये 129.87 च्या स्ट्राईक रेटने हे शतक झळकावलं. ऋतुराजने या खेळीत 2 सिक्स आणि 12 फोर लगावले.
ऋतुराज आणखी मोठी खेळी करण्यात अपयशी
ऋतुराजला शतकी खेळी मोठ्या आकड्यात बदलण्याची संधी होती. मात्र ऋतुराज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. ऋतुराज शतकानंतर अवघ्या काही धावा करुन आऊट झाला. ऋतुराजने 83 बॉलमध्ये 105 रन्स केल्या. मार्को यान्सेन याने ऋतुराजच्या खेळीला ब्रेक लावला.
विराटसोबत तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी
दरम्यान ऋतुराजने शतक करण्यासह विराट कोहली याच्यासह विक्रमी भागीदारी रचली. या जोडीने मोठी भागीदारी करत टीम इंडियाच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. विराट आणि ऋतुराज या जोडीला तिसऱ्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी करण्याची संधी होती. मात्र अवघ्या 5 धावांनी द्विशतकी भागीदारी हुकली. या दोघांनी 156 बॉलमध्ये 195 रन्सची पार्टनरशीप केली.
