AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका पहिला सामना, कसोटीला किती वाजता सुरुवात होणार?

India vs South Africa 1st Test Live Steaming : टीम इंडिया मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 14 नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेत भिडणार आहे. उभयसंघातील सलामीचा सामना हा कोलकातात होणार आहे.

IND vs SA : भारत-दक्षिण आफ्रिका पहिला सामना,  कसोटीला किती वाजता सुरुवात होणार?
India vs South Africa 1st TestImage Credit source: TV9 Bharatvarsh
| Updated on: Nov 13, 2025 | 4:45 PM
Share

टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर आता 14 नोव्हेंबरपासून मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2 हात करणार आहे. टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. उभयसंघात कसोटी मालिकेत एकूण 2 सामने होणार आहेत. या मालिकेतील सलामीच्या सामन्यासाठी दोन्ही संघांनी जोरदार सराव केला आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या मालिकेत विजयाने सुरुवात करण्याचा प्रयत्न असणार आहे. मात्र कोणत्या एकाच संघाचा विजय होणार आहे. त्यामुळे चाहत्यांना पहिल्याच सामन्यात चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. उभयसंघातील पहिला कसोटी सामना हा कधी आणि कुठे होणार? याबाबतची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेऊयात.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना कधी?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना हा 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना कुठे?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना कोलकातामधील ईडन गार्डन्समध्ये खेळवण्यात येणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 9 वाजता टॉस होईल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला कसोटी सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

नेतृत्व कुणाकडे?

शुबमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचं नेतृत्व करणार आहे. तर ऋषभ पंत याचं दुखापतीनंतर कसोटी संघात पुनरागमन झालं आहे. पंतकडे उपकर्णधार, विकेटकीपिंग आणि बॅटिंग अशी तिहेरी जबाबदारी आहे. तर टेम्बा बावुमा दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. उभयसंघातील ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीअंतर्गंत खेळवण्यात येणार आहे.

टीम इंडिया या साखळीत आतापर्यंत अजिंक्य आहेत. भारताने या साखळीतील 2 पैकी 1 मालिका जिंकली आहे. तर 1 मालिका बरोबरीत सोडवली आहे. त्यामुळे भारतीय संघ तिसऱ्या कसोटीत कशी कामगिरी करणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...