
केएल राहुल याच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघाने रांचीतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात केली. भारताने या सामन्यात विराट कोहली याने केलेल्या शतकाच्या जोरावर 349 धावांचा डोंगर उभारला. मात्र भारताला या सामन्यात 349 धावा करुनही फक्त 17 रन्सनेच विजय मिळवता आला. दक्षिण आफ्रिकेची 350 धावांचा पाठलाग करताना खास सुरुवात मिळाली नाही. मात्र मिडल आणि लोअर ऑर्डरमधील फलंदाजांनी जोरदार प्रतिकार केला. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी केलेल्या या प्रतिकारामुळे चाहत्यांना विजयाची आशा होती. मात्र भारताने शेवटच्या ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेला ऑलआऊट केलं आणि हा सामना जिंकला. भारताने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. विराटने केलेल्या शतकी खेळीमुळे त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आंलं. दरम्यान उभयसंघातील दुसरा सामना हा 3 डिसेंबरला होणार आहे.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर 17 धावांनी मात केली आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 350 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेला ऑलआऊट 332 धावाच करता आल्या. दक्षिण आफ्रिकेला विजयी करण्यासाठी लोअर ऑर्डरमधील फलंदाजांनी खूप प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. भारताने अशाप्रकारे हा सामना आपल्या नावावर केला.
कॉर्बिन बॉश याने अखेरच्या क्षणी फटकेबाजी करत सामना रंगतदार स्थितीत आणून ठेवला आहे. दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 6 बॉलमध्ये 18 धावांची गरज आहे. हा सामना कोण जिंकणार? हे काही मिनिटांत स्पष्ट होईल.
अर्शदीप सिंह याने नांद्रे बर्गर याला आऊट करत दक्षिण आफिकेला नववा झटका दिला आहे. नांद्रे बर्गर याने 23 बॉलमध्ये 17 रन्स केल्या. अर्शदीपची ही दुसरी विकेट ठरली.
कुलदीप यादव याने दक्षिण आफ्रिकेला आठवा झटका दिला आहे. कुलदीपने प्रेनेलन सुब्रायन याला कॅप्टन-विकेटकीपर केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं. सुब्रायन याने 16 बॉलमध्ये 17 रन्स केल्या.
कुलदीप यादव याने एकाच ओव्हरमध्ये 2 विकेट्स घेत मॅच फिरवली आहे. कुलदीपने आधी मार्को यान्सेन याला आऊट केलं. त्यानंतर कुलदीपने मॅथ्यू ब्रिट्झके याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. मार्को यान्सेन याने 70 तर मॅथ्यू ब्रिट्झकने 72 धावांची खेळी केली.
मॅथ्यू ब्रिट्झकेनंतर मार्को यान्सेन याने अर्धशतक झळकावलं आहे. मॅथ्यू आणि यान्सेन या जोडीने अर्धशतक करत दक्षिण आफ्रिकेला 200 धावांपर्यंत पोहचवलं आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी आणखी 150 धावांची गरज आहे.
मॅथ्यू ब्रिट्झके याने दक्षिण आफ्रिकेसाठी झुंजार अर्धशतक झळकावलं आहे. भारताने दक्षइण आफ्रिकेला ठराविक अंतराने 5 झटके दिले. मात्र या दरम्यान मॅथ्यूने एक बाजू लावून धरली आणि अर्धशतक पू्र्ण केलं.
हर्षित राणा याने डेवाल्ड ब्रेव्हीस याला ऋतुराज गायकवाड याच्या हाती कॅच आऊट करुन मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. डेवाल्डने 28 बॉलमध्ये 37 रन्स केल्या. हर्षितची ही तिसरी विकेट ठरली.
कुलदीप यादव याने त्याच्या कोट्यातील पहिल्याच ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेची सेट जोडी फोडली. कुलदीपने टॉनी डी झॉर्जी याला एलबीडब्ल्यू आऊट केलं. टॉनीने 35 बॉलमध्ये 39 रन्स केल्या.
टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला झटपट 3 झटके दिले. त्यानंतर मॅथ्यू ब्रीट्झके-टॉनी डी झॉर्जी या जोडीने दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला आहे. दक्षिण आफ्रिकेने 12 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 58 धावा केल्या आहेत. टॉनी 29 आणि मॅथ्यू 21 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
हर्षित राणा याने एकाच ओव्हरमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या 2 फलंदाजांना आऊट केलं. त्यानंतर अर्शदीप सिंह याने दक्षिण आफ्रिकेला तिसरा झटका देत आपली पहिली विकेट मिळवली. अर्शदीपने एडन मार्रक्रम याला कॅप्टन आणि विकेटकीपर केएल राहुल याच्या हाती कॅच आऊट केलं.
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने धमाका केला आहे. हर्षितने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या ओव्हरमध्ये 2 झटके दिले. हर्षितने रायन रिकेल्टन आणि क्विंटन डी कॉक या दोघांना झिरोवर आऊट केलं आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 350 धावांचं आव्हान ठेवलं आहे. या विजयी धावांचा पाठलाग करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेकडून कॅप्टन एडन मार्रक्रम आणि रायन रिकेल्टन ही जोडी मैदानात आली आहे.
टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर 350 धावांचं डोंगराएवढं आव्हान ठेवलं आहे. भारताने 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 349 धावा केल्या. टीम इंडियासाठी विराट कोहली याने सर्वाधिक 135 धावा केल्या. रोहित शर्मा याने 57 तसेच कॅप्टन केएल राहुल याने 60 धावांची खेळी केली.
जळगावातील जामनेर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ज्योत्स्ना विसपुते यांचा अर्ज नामंजूर करण्यात आला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना महाजन बिनविरोध विजयी असून यावर ज्योत्स्ना विसपुते यांनी त्यांच्या विजयावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
टीम इंडियाने 44.5 ओव्हरमध्ये 300 धावा पूर्ण केल्या आहेत. भारताने 250 ते 300 हा 50 धावांचा टप्पा अवघ्या 36 बॉलमध्ये पूर्ण केला. आता टीम इंडिया उर्वरित 31 बॉलमध्ये किती धावा जोडणार? याकडे चाहत्यांचं लक्ष आहे.
दक्षिण आफ्रिकेने भारताला पाचवा आणि मोठा झटका दिला आहे. नांद्रे बर्गर याने विराट कोहली याला आऊट केलं. विराटने 120 बॉलमध्ये 135 रन्स केल्या.
विराट कोहली याने 38 व्या ओव्हरमध्ये फोर ठोकत वनडे करियरमधील 52 वं शतक झळकावलं आहे. विराटच्या या शतकासह मैदानात क्रिकेट चाहत्यांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.
विराट कोहली शतकाच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. विराट 93 रन्सवर नॉट आऊट खेळत आहे. भारताने 35 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 218 रन्स केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेने भारताला चौथा झटका दिला आहे. ऋतुराज गायकवाड याच्यानंतर वॉशिंग्टन सुंदर याने काही वेळ विराट कोहली याला चांगली साथ दिली. मात्र सुंदर 31 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कॅच आऊट झाला. सुदंरने 13 रन्स केल्या.
डेवाल्ड ब्रेव्हीस याने अफलातून कॅच घेत ऋतुराज गायकवाड याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. यासह ऋतुराजच्या खेळीचा 8 धावांवर शेवट झाला. ऋतुराज आऊट झाल्याने भारताची स्कोअर 26.3 ओव्हरमध्ये 3 आऊट 184 असा आहे.
रोहित आऊट झाल्यानंतर ऋतुराज गायकवाड मैदानात आला आहे. ऋतुराजची चौथ्या स्थानी खेळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऋतुराज चौथ्या स्थानी किती धावा करतो? याकडे लक्ष असणार आहे.
भारताने दुसरी विकेट गमावली आहे. मार्को यान्सेन याने रोहित शर्मा-विराट कोहली ही सेट जोडी फोडली आहे. यान्सेन याने रोहितला एलबीडब्ल्यू आऊट केलं. रोहितने 51 बॉलमध्ये 57 रन्स केल्या.
विराट कोहली याच्यानंतर रोहित शर्मा यानेही अर्धशतक पूर्ण केलं आहे. भारताने 19 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 146 रन्स केल्या आहेत. विराट 64 आणि रोहित 50 रन्सवर नॉट आऊट खेळत आहेत.
विराट कोहली याने सिक्स झळकावत अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटने 18 व्या ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर सिक्स लगावला. विराटने यासह हे अर्धशतक पूर्ण केलं.
रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली आहे. या जोडीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकी भागीदारी करण्याची 20 वी वेळ ठरली आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या दोघांत अर्धशतकासाठी चुरस पाहायला मिळत आहे. भारताने 16 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 122 धावा केल्या आहेत. रोहित आणि विराट दोघेही 45 धावांवर नाबाद खेळत आहेत.
रोहित शर्मा आणि विराट कोहली भारताची अनुभवी जोडी सेट झाली आहे. भारताने 25 धावांवर यशस्वी जैस्वाल याच्या रुपात पहिली विकेट गमावली. यशस्वी 18 धावांवर आऊट झाला. त्यानंतर रोहित आणि विराट या दोघांनी भारताचा डाव पुढे चालवला. भारताने 12 ओव्हरनंतर 1 विकेट गमावून 94 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा याने 7 व्या ओव्हरमधील शेवटच्या बॉलवर चौकार लगावला. यासह भारताने 50 धावा पूर्ण केल्या. टीम इंडियाने 7 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 52 धावा केल्या आहेत.
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्मा याला जीवनदान मिळालं आहे. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू टॉनी डी झॉर्जी याने रोहितचा 1 धावेवर कॅच सोडला. त्यामुळे आता रोहित या संधीचा किती फायदा घेणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
मार्को यान्सेन याने टीम इंडियाला चौथ्या ओव्हरमधील पहिल्या बॉलवर पहिला झटका दिला आहे. यान्सेनने भारताच्या 25 धावा असताना यशस्वी जैस्वाल याला 18 धावांवर विकेटकीपर क्विंटन डी कॉक याच्या हाती कॅच आऊट केलं. यशस्वी आऊट झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिल्या एकदिवसीय सामन्याला सुरुवात झाली आहे. दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून यशस्वी जैस्वाल आणि रोहित शर्मा ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
रायन रिकेल्टन, क्विंटन डी कॉक(विकेटकीपर), एडन मार्रक्रम (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, टोनी डी झोर्झी, डेवाल्ड ब्रेविस, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, प्रिनेलन सुब्रेन, नांद्रे बर्गर आणि ओटनील बार्टमन.
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड, वॉशिंग्टन सुंदर, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि प्रसीध कृष्णा.
टीम इंडिया विरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला आहे. कॅप्टन एडन मार्रक्रम याने फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे.
एडन मार्करम, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बवुमा (कॅप्टन), मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेव्हिस, रुबिन हरमन, मार्को यान्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, लुंगी एनगिडी, रायन रिकेल्टन, ओटनील बार्टमन, टोनी डी झोर्झी आणि प्रिनेलन सुब्रेन.
यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल (कॅप्टन आणि विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, प्रसीद कृष्णा, रुतुराज गायकवाड, तिलक वर्मा, ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या एकिदवसीय सामन्याला दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 1 वाजता टॉस होणार आहे. या मालिकेत कोणता संघ विजयी सलामी देणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.