AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA Odi : टीम इंडियाचं वनडे रँकिंगमधील पहिल्या स्थान धोक्यात? दक्षिण आफ्रिकेपासून धोका?

India vs South Africa Odi Series : भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेत 0-2 फरकाने पराभूत व्हावं लागलं. त्यामुळे भारतासमोर दक्षिण आफ्रिकेला एकदिवसीय मालिकेत रोखण्याचं आव्हान आहे.

IND vs SA Odi : टीम इंडियाचं वनडे रँकिंगमधील पहिल्या स्थान धोक्यात? दक्षिण आफ्रिकेपासून धोका?
Team India Odi RankingImage Credit source: Bcci
| Updated on: Nov 28, 2025 | 7:20 PM
Share

भारताला दक्षिण आफ्रिकेकडून 0-2 अशा फरकाने व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारताला दोन्ही सामन्यांमध्ये एकतर्फी फरकाने पराभूत केलं. दक्षिण आफ्रिकेने यासह भारतात 25 वर्षांनंतर कसोटी मालिका जिंकण्याची कामगिरी केली. भारताला या पराभवामुळे मोठा झटका लागला. भारताची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या रँकिगमध्ये घसरण झाली. टीम इंडिया या पराभवासह थेट पाचव्या स्थानी फेकली गेली. तर दक्षिण आफ्रिकेने दुसरं स्थान काबिज केलं. आता उभयसंघात 30 नोव्हेंबरपासून एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना हा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याचं होमग्राउंड असलेल्या रांची शहरात होणार आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघ वनडे रँकिंगमध्ये कितव्या स्थानी आहेत? हे जाणून घेऊयात. तसेच टीम इंडियाला कसोटीप्रमाणे वनडेतही दक्षिण आफ्रिकेकडून धोका आहे का? हे समजून घेऊयात.

टीम इंडिया अव्वल स्थानी

आयसीसीने अखेरीस 22 नोव्हेंबर रोजी वनडे रँकिंग अपडेट केली होती. त्यानुसार टीम इंडिया आयसीसी वनडे रँकिंगमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. टीम इंडियाच्या खात्यात 122 रेटिंग पॉइंट्स आहेत. दुसर्‍या स्थानी चॅम्पियन्स ट्रॉफी उपविजेता न्यूझीलंड आहे. वर्ल्ड कप विजेता ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तान चौथ्या आणि श्रीलंका पाचव्या स्थानी आहे.

दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानी

दक्षिण आफ्रिका टॉप 5 मध्ये नाही. दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानी विराजमान आहे. दक्षिण आफ्रिकेचे रेटिंगही 100 पेक्षा कमी आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या खात्यात 98 रेटिंग आहेत. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तब्बल 5 स्थानांचा फरक आहे. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरिजमधून भारताच्या सिंहासनाला कोणताही धोका नाही.

मालिका गमावल्यास किती फरक पडणार?

भारताने एकदिवसीय मालिका 0-3 ने गमावली तरी पहिलं स्थान कायम राहिलं. सलग 3 सामन्यांमधील पराभवांनतर भारताचे 117 रेटिंग पॉइंट्स होतील. तर दक्षिण आफ्रिकेने 3-0 ने मालिका जिंकल्यास त्यांच्या खात्यातील रेटिंग पॉइंट्स 103 होतील. तसेच दक्षिण आफ्रिका सहाव्या स्थानावरुन पाचव्या क्रमांकावर पोहचेल.

दोन्ही संघांचे कर्णधार

टेम्बा बवुमा कसोटी मालिकेनंतर वनडे सीरिजमध्येही दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व करणार आहे. तर नियमित कर्णधार शुबमन गिल याला दुखापतीमुळे या मालिकेला मुकावं लागलं आहे. त्यामुळे शुबमनच्या जागी विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याला कर्णधार करण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.