IND vs SA T20 World Cup Final 2024 : बॅड न्यूज, बारबाडोसमध्ये आता हवामानाची काय स्थिती आहे? VIDEO
IND vs SA T20 World Cup Final 2024 : टीम इंडिया सातव्यांदा कुठल्याही वर्ल्ड कपच्या फायनल खेळत आहे. आतापर्यंत टीम इंडियाने तीन वेळा वर्ल्ड कप फायनल जिंकली आहे. दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच कुठल्याही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आपल्यावर बसलेला चोकर्सचा शिक्का पुसण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलला आता फक्त काही तास उरले आहेत. भारतातील स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजता, त्यावेळी वेस्ट इंडिजमधील स्थानिक वेळेनुसार सकाळी 10.30 वाजलेले असतील. ब्रिजटाऊन मधील बारबडोसच्या केंसिग्टन ओवल स्टेडियमवर फायनल सामना खेळला जाणार आहे. भारतात आता दिवस आहे, तर वेस्ट इंडिजमध्ये रात्र आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सेमीफायनल सामना गुयाना येथे खेळला गेला. तिथे पावसाची भविष्यवाणी करण्यात आली होती. अपेक्षेप्रमाणे पाऊस आल्याने सामन्याला उशीर झाला. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नव्हता. पण पूर्ण मॅच व्हावी, यासाठी अतिरिक्त वेळ देण्यात आली होती. त्यानुसार अतिरिक्त वेळेत सामना पूर्ण झाला.
बारबाडोसमध्ये फायनलच्या दिवशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बारबाडोसमध्ये आता रात्र असून तिथे मुसळधार पाऊस कोसळतोय. X वर एका युजरने पोस्ट करुन ही माहिती दिलीय. रात्रीचे 11 वाजलेत. बारबाडोसमध्ये आता पाऊस कोसळतोय. केंसिग्टन ओवल स्टेडियमपासून मी 3 किलोमीटर अंतरावर आहे. एकदम वादळी पाऊस कोसळतोय. हवामानाचा अंदाज वर्तवणारे ॲप इथे काहीच उपयोगाचे नाहीयत असं या युजरने म्हटलं आहे.
It’s 11PM here in Barbados and it’s absolutely pouring right now, I am 3KM away from Kensington Oval. A proper storm, just hear how hard it is raining. AccuWeather shows nothing.
Weather apps are absolutely useless here. I will be very surprised if game starts on time. pic.twitter.com/4o9rFqbfxM
— Shreya (@shreyamatsharma) June 29, 2024
टीम इंडियाची सातवी वर्ल्ड कप फायनल
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याच्या फायनलसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. असंच हवामान राहीलं, तर सकाळी टॉसला विलंब होऊ शकतो. दुसऱ्या एका नेटीझनच्या मते रविवारपासून इथे वातावरण आणखी बिघडू शकत. त्यामुळे शनिवारी पूर्ण 40 षटकांचा खेळ पहायला मिळेल अशी अपेक्षा आहे. टीम इंडिया सातव्यांदा कुठल्याही वर्ल्ड कपच्या फायनल खेळत आहे. आतापर्यंत टीम इंडियाने तीन वेळा वर्ल्ड कप फायनल जिंकली आहे. दक्षिण आफ्रिका पहिल्यांदाच कुठल्याही वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आपल्यावर बसलेला चोकर्सचा शिक्का पुसण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
