
सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी 20i सामन्यात पराभूत व्हावं लागलं. उभयसंघात 11 डिसेंबरला झालेल्या दुसर्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर 51 धावांनी मात करत मालिकेत 1-1 ने बरोबरी केली. टीम इंडियाचा हा भारतातील विजयी धावांचा पाठलाग करतानाचा सर्वात मोठा पराभव ठरला. त्यामुळे भारताचा हा लाजिरवाणा पराभव असल्याचंही कर्णधार सूर्यकुमार यादव याने मान्य केलं. अशात आता टीम इंडिया तिसऱ्या सामन्यात दुसर्या मॅचमधील पराभवाची परतफेड करुन मालिकेत आघाडी घेण्यासाठी उतरणार आहे. हा तिसरा सामना कधी आणि कुठे पाहता येईल? हे जाणून घेऊयात.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20i सामना रविवारी 14 डिसेंबरला होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20i सामना हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, धर्मशाला इथे होणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या टी 20i सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20i सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसरा टी 20i सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवरुन लाईव्ह पाहायला मिळेल. तसेच टीव्ही9 मराठी वेबसाईटवरुन सामन्याबाबत लाईव्ह अपडेट जाणून घेता येईल.
दरम्यान तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाचा ओपनर आणि उपकर्णधार शुबमन गिल याच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. शुबमनला या मालिकेतील पहिल्या 2 सामन्यांत काही खास करता आलं नाही. शुबमनने या मालिकेत दुखापतीनंतर कमबॅक केलं. मात्र शुबमनला त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे शुबमनवर मोठी खेळी करण्याचा दबाव असणार आहे.