AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: टीम इंडियाआधी दक्षिण आफ्रिकेला Corona Virus ने दिला झटका, दिग्गज फलंदाजाला कोरोनाची लागण

भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टीम (South Africa Team) इंडियाच्या आधी कोरोना व्हायरसने (Corona virus) झटका दिला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका टॉप फलंदाजाला कोरोनाची लागण झाली आहे.

IND vs SA: टीम इंडियाआधी दक्षिण आफ्रिकेला Corona Virus ने दिला झटका, दिग्गज फलंदाजाला कोरोनाची लागण
South Africa Team Image Credit source: bcci
| Updated on: Jun 09, 2022 | 8:25 PM
Share

मुंबई: भारत दौऱ्यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला टीम (South Africa Team) इंडियाच्या आधी कोरोना व्हायरसने (Corona virus) झटका दिला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या एका टॉप फलंदाजाला कोरोनाची लागण झाली आहे. एडन मार्करमचा (Aiden Markram) कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज पहिला T 20 सामना सुरु होण्याआधी एडन मार्करमला कोविडची बाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. टॉसच्यावेळी कॅप्टन टेंबा बावुमाने मार्करामला कोविडची लागण झाल्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध नसल्याचं सांगितलं. त्याला कधी कोविडची बाधा झाली? संघातील कुठल्या खेळाडूंना कोरोना झालाय, त्याची माहिती बावुमाने दिली नाही.

बायो बबलशिवाय मालिका

भारत-दक्षिण आफ्रिकेमधील पाच टी 20 सामन्यांची मालिका बायो बबलशिवाय खेळली जात आहे. बायो बबलची बंधन या मालिकेवर नाहीयत. 2020 मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर पहिल्यांदाच भारत-दक्षिण आफ्रिका सीरीज बायो बबल शिवाय खेळली जात आहे. स्थिती सामान्य होत असल्याचं हे लक्षण आहे. मार्करम पॉझिटिव्ह आल्यामुळे बीसीसीआयची चिंता थोडी वाढली आहे.

कधी रिपोर्ट पॉझिटिव्ह आला

बुधवारी 8 जूनला शेवटच्या टेस्टिंगमध्ये मार्करमचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. टीमचा अन्य कुठल्याही सदस्य संक्रमित नाहीय. कोरोना संक्रमित झाल्यानंतर दोन्ही बोर्डामध्ये ठरल्यानुसार मार्करम क्वारंटाइन झाला आहे.

मार्करमचा दमदार फॉर्म

एडन मार्करमचं कोरोना पॉझिटव्ह होणं, दक्षिण आफ्रिकेसाठी एक मोठा झटका आहे. कारण नुकत्याच संपलेल्या आयपीएल 2022 मध्ये त्याने सनरायजर्स हैदराबादकडून 400 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. त्याशिवाय तो पार्ट टाइम ऑफस्पिन्र आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.