AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटी सामन्याला आणखी लवकर सुरुवात होणार, जाणून घ्या वेळ

India vs South Africa 2nd Test Match Time : क्रिकेट चाहत्यांना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरुवातीपासून पाहण्यासाठी थोडी झोपमोड करावी लागणार आहे. जाणून घ्या.

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटी सामन्याला आणखी लवकर सुरुवात होणार, जाणून घ्या वेळ
Axar Patel Rishabh Pant and KL Rahul Team IndiaImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Nov 18, 2025 | 10:34 PM
Share

भारतीय संघाला पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. कोलकातातील इडन गार्डन्समधील फिरकीपटूंसाठी फायदेशीर असलेल्या या खेळपट्टीवर टीम इंडियाचे फलंदाज ढेर झाले. दक्षिण आफ्रिकेने भारताला फक्त 124 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दक्षिण आफ्रिकेसमोर भारतीय फलंदाजांनी गुडघे टेकले. दक्षिण आफ्रिकेने भारताला 93 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेने यासह 30 धावांनी सामना जिंकला. दक्षिण आफ्रिकेने या विजयासह मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. ही मालिका 2 सामन्यांचीच आहे.त्यामुळे भारतासाठी दुसरा आणि अंतिम सामना आरपार आणि प्रतिष्ठेचा झाला आहे.

टीम इंडियाला ही मालिका गमावायची नसेल तर कोणत्याही स्थितीत सामना जिंकावाच लागणार आहे. भारताला न्यूझीलंडकडून मायदेशातच 0-3 फरकाने मालिका गमवावी लागली होती. त्यामुळे टीम इंडियावर मायदेशात काही महिन्यात दुसरी मालिका गमावण्याची टांगती तलवार आहे. त्यामुळे भारताला ही नामुष्की टाळायची असेल तर कोणत्याही स्थितीत विजय मिळवावाच लागणार आहे.

दुसरा सामना कधीपासून?

टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात कसोटी मालिकेतील दुसरा आणि अंतिम सामना हा 22 नोव्हेंबरपासून होणार आहे. हा सामना गुवाहाटीत होणार आहे. दुसर्‍या सामन्याला पहिल्या सामन्यापेक्षा काही मिनिटांआधी सुरुवात होणार आहे.

30 मिनिटांआधी सामना सुरु होणार

कोलकातात पहिल्या कसोटी सामन्याला सकाळी 9 वाजून 30 सुरुवात झाली होती. मात्र कोलकाताच्या तुलनेत गुवाहाटीत 30 मिनिटांआधी नाणेफेक आणि सामना सुरु होणार आहे. गुवाहाटीत 9 वाजता सामना सुरु होईल. तर त्याआधी 8 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

आधी चहा मग जेवण

कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत लंच ब्रेक आणि त्यानंतर टी ब्रेक होतो. मात्र गुवाहाटीत यंदा ही परंपरा बदलणार आहे. गुवाहाटीत आधी टी ब्रेक होणार आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात लंचआधी टी ब्रेक होण्याची ही पहिलीच वेळ ठरणार आहे.

गुवाहाटीत पहिल्यांदा कसोटी सामना

गुवाहाटीतील क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सवाचं वातावरण आहे. गुवाहाटीत पहिल्यांदाच कसोटी सामना होणार आहे. त्यामुळे चाहते गुवाहाटीतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज आहेत.

टीम इंडिया हिशोब करणार?

भारतीय संघावर पहिल्या सामन्यातील पराभवामुळे जोरदार टीका करण्यात आली. त्यामुळे आता टीम इंडिया दुसरा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेचा हिशोब करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे टीम इंडिया या सामन्यात पहिल्या पराभवानंतर कोणत्या रणनितीने मैदानात उतरते? याची उत्सूकता क्रिकेट चाहत्यांना लागून आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी