AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीत खेळण्याबाबत शुबमन गिल स्पष्टच म्हणाला…

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 पर्वातील भारत कसोटी मालिका खूपच महत्त्वाची आहे. या मालिकेतील चांगल्या कामगिरी दोन्ही संघांचं पुढचं गणित ठरणार आहे. असं असताना पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कर्णधार शुबमन गिलने आपलं म्हणणं मांडलं आहे.

IND vs SL: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीत खेळण्याबाबत शुबमन गिल स्पष्टच म्हणाला...
IND vs SL: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीत खेळण्याबाबत शुबमन गिल स्पष्टच म्हणाला..Image Credit source: BCCI Twitter
| Updated on: Aug 14, 2026 | 5:31 PM
Share

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे होत असून दोन्ही संघ या सामन्यासाठी सज्ज आहेत. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 अंतिम फेरीत जागा मिळवण्यासाठी दोन्ही संघांना हा सामना महत्त्वाचा आहे. कारण दोन्ही संघांची स्थिती जवळपास तशीच आहे. त्यामुळे अंतिम फेरी गाठण्यासाठी या मालिकेत 2-0 ने विजय मिळवणं आवश्यक आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिल पत्रकार परिषदेला सामोरं गेला. त्याने श्रीलंका कसोटी मालिका किती महत्त्वाची आहे? याचा उल्लेख केला. श्रीलंकेविरुद्धची मालिका जिंकलो तर आणि तरच पुढचं गणित सुटू शकतं याची कल्पना कर्णधार शुबमन गिलला आहे. त्यामुळे त्याने पत्रकार परिषदेत याबाबत आपलं म्हणणं मांडलं.

शुबमन गिल काय म्हणाला?

शुबमन गिलने पत्रकार परिषदेत आपलं म्हणणं स्पष्टपणे मांडलं. शुबमन गिल म्हणाला की, ‘मी कर्णधाराच्या भूमिकेत खूप समाधानी आहे. कसोटी चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहणे आमचं ध्येय आहे. यासाठी आम्हाला उर्वरित नऊ पैकी सात ते आठ कसोटी सामने जिंकावे लागतील. त्याची सुरूवात आम्हाला येथूनच करावी लागणार आहे.’ भारताने आतापर्यंत 9 कसोटी सामने खेळले असून त्यापैकी चार सामन्यात विजय, चार सामन्यात पराभव आणि एक सामना अनिर्णित ठरला आहे. भारतीय संघ 48.15 विजयी टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे.

भारतासाठी पहिला कसोटी सामना ऐतिहासिक

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला कसोटी सामना टीम इंडियासाठी ऐतिहासिक असणार आहे. भारताचा हा 600वा कसोटी सामना असणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनी हा सामना होत असल्याने त्याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. याबाबत शुबमन गिलने आपल्या भावना व्यक्त केल्या. शुबमन गिल म्हणाला की, ‘600व्या कसोटी सामन्यात माझ्या देशाचं नेतृत्व करणं हा माझ्यासाठी सन्मान आहे. स्वातंत्र्यदिनी असं करणं हा त्याहूनही मोठा सन्मान आहे.’

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...