Hardik Pandya, IND vs SL : कॅप्टन हार्दिक पंड्याची शानदार अनोखी हॅटट्रिक

संजय पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Jan 07, 2023 | 11:25 PM

हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) श्रीलंका विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात 2 विकेट्स घेतल्या, त्यानंतरही त्याने हॅटट्रिक पूर्ण केली.

Hardik Pandya, IND vs SL : कॅप्टन हार्दिक पंड्याची शानदार अनोखी हॅटट्रिक

Captain Hardik Pandya : टीम इंडियाने नववर्षाची सुरुवात मालिका विजयाने केलीय. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात टीम इंडियाने 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेत श्रीलंकेवर 2-1 ने विजय मिळवला आहे. या तिसऱ्या सामन्यासह भारताने मालिकाही जिंकली. सूर्यकुमार यादवने शानदार शतक केलं. तर त्यानंतर गोलंदाजांनीही कमाल केली. अर्शदीप सिंहने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर कर्णधार हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) 2 विकेट्स घेतल्या. मात्र त्यानंतरही हार्दिकने अनोखी हॅटट्रिक पूर्ण केली. (ind vs sl 3rd t20i team india win series and complete a unique hat trick in under hardik pandya captaincy)

हार्दिकची अनोखी हॅटट्रिक

हार्दिकच्या नेतृत्वात टीम इंडियाने सलगपणे तिसऱ्यांदा टी 20 मालिका जिंकण्याचा कारनामा केलाय. यानुसार हार्दिकची कर्णधार म्हणून मालिका विजयाची ही हॅटट्रिक ठरलीय. आतापर्यंत हार्दिकने आयर्लंड आणि त्यानंतर न्यूझीलंड विरुद्ध 2022 मध्ये नेतृत्व केलं आहे. इतकंच नाही, तर या मालिकांमध्ये टीम इंडियाला विजयीही केलं आहे. त्यानंतर आता तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत हार्दिकने कर्णधार म्हणून टी 20 मालिकेतील विजयी हॅटट्रिक पूर्ण केली आहे.

कॅप्टन हार्दिकची आकडेवारी

हार्दिकने आतापर्यंत एकूण 7 टी 20 सामन्यात भारताचं नेतृत्व केलंय. यापैकी 5 वेळा टीम इंडियाचा विजय झालाय. एकदा पराभव झालाय. तर एक सामना टाय झालाय.

हे सुद्धा वाचा

हार्दिकने जून 2022 मध्ये आयर्लंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतील दोन्ही सामन्यांमध्ये भारताला विजयी केलं. त्यानंतर जुलै महिन्यात विडिंज विरुद्धच्या टी 20 मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात हार्दिकने टीम इंडियाला विजयी केलं.

हार्दिकला त्यानंतर न्यूझीलंड विरुद्धच्या 2 सामन्यांच्या टी 20 मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली. हार्दिकच्या नेतृत्वात टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करत विजयी सुरुवात केली. त्यानंतर दुसरा सामना हा टाय झाला. त्यामुळे भारताने ही मालिका 1-0 ने जिंकली. त्यानंतर आता तिसरा सामना जिंकून हार्दिकने श्रीलंका विरुद्धची मालिका 2-1 ने खिशात घातली आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI