AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

INDvSL | टीम इंडियात तिसऱ्या वनडेआधी दिग्ग्जाची एन्ट्री होणार

टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हा रविवारी 15 जानेवारीला तिरुअनंतपूरमला खेळवण्यात येणार आहे.

INDvSL | टीम इंडियात तिसऱ्या वनडेआधी दिग्ग्जाची एन्ट्री होणार
| Updated on: Jan 13, 2023 | 8:14 PM
Share

मुंबई : क्रिकेट विश्वातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. टीम इंडिया विरुद्ध श्रीलंका यांच्यात एकदिवसीय मालिका सुरु आहे. टीम इंडियाने कोलकातात दुसरा सामना जिंकून 2-0 अशा फरकाने मालिका जिंकली. या दुसऱ्या सामन्यात चायनामन गोलंदाज कुलदीप यादव आणि केएल राहुल हे दोघे भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. आता सीरिजमधील तिसरा आणि शेवटचा सामना हा रविवारी 15 जानेवारीला खेळवण्यात येणार आहे. त्याआधी टीम इंडियासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविड हे अचानक आपल्या घरी परतले आहेत.

द्रविडची तब्येत बिघडली

तब्येत बिघडल्याने राहुल द्रविड टीम इंडियाची साथ सोडत घरी परतले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, द्रविडला उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याची माहिती आहे. त्यामुळे द्रविडने कोलकाताहून तिरुअनंतपूरमला जाण्याऐवजी बंगळुरुला जाण्याचा निर्णय घेतला. तिसरी वनडे ही तिरुवनंतरपूरमला खेळवण्यात येणार आहे.

द्रविडचे काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच दुसऱ्या वनडेआधी द्रविडला हॉटेलमध्ये अस्वस्थ वाटत होतं. त्यानंतर बंगाल क्रिकेट बोर्डाकडून द्रविडच्या तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी डॉक्टर देण्यात आला.

तिसऱ्या सामन्याआधी तब्येत सुधारली तर द्रविड पुन्हा टीमसोबत जोडला जाईल. मात्र तस न झाल्यास तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी कोण सांभाळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

त्यामुळे आता कोच म्हणून द्रविडच्या गैरहजेरीत जबाबदारी कोण सांभाळणार, असा प्रश्न बीसीसीआयसमोर आवासून उभा आहे. पण यावरही उपाय शोधून काढण्यात आला आहे. द्रविडच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियाच्या कोचपदाची जबाबदारी सांभाळू शकतो. याआधीही लक्ष्मण टीम इंडियासोबत आयर्लंड दौऱ्यावर कोच म्हणून गेला होता. तसेच याआधी लक्ष्मणने एनसीए हेड म्हणूनही जबाबदारी पार पाडलीय.

जर लक्ष्मण टीमसोबत कोच म्हणून जोडला गेला, तर नक्कीच श्रीलंकेच्या गोटात चिंतेच वातावरण पाहायला मिळेल. लक्ष्मणला खूप अनुभवी खेळाडू आहे. त्यात टीम इंडिया आधीच मालिका जिंकली आहे. त्यामुळे लक्ष्मणचा टीम इंडियाला मोठ्या फरकाने मालिका जिंकून देण्याचा मानस असेल.

दरम्यान टीम इंडियाने दुसऱ्या सामन्यात 4 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने आधी श्रीलंकेला 39.4 ओव्हरमध्येच 215 रन्सवर ऑलआऊट केलं. त्यानंतर टीम इंडियाने हे आव्हान 43.2 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून पूर्ण केलं. टीम इंडियाकडून आधी कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज या जोडीने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर त्यानंतर टीम इंडिया अडचणीत असताना केएल राहुलने निर्णायक क्षणी नाबाद अर्धशतक करत विजयापर्यंत पोहचवलं.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.