IND vs SL Pink Ball Test : रोहितचा 400 वा सामना, विराटच्या 71 व्या शतकाची प्रतीक्षा, डे-नाईट कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज

भारतात खेळवण्यात आलेल्या आतापर्यंतच्या दोन डे-नाईट कसोटी सामन्यांमधील पहिल्या डावाचे आकडे पाहिले तर ते दोन्ही संघांना घाबरवू शकतात. भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या दोन डे-नाईट कसोटी सामन्यांमध्ये पहिल्या डावात अनुक्रमे 106 आणि 112 धावा झाल्या आहेत.

IND vs SL Pink Ball Test : रोहितचा 400 वा सामना, विराटच्या 71 व्या शतकाची प्रतीक्षा, डे-नाईट कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज
Rohit Sharma, Virat Kohli (Test)
Follow us
| Updated on: Mar 12, 2022 | 11:31 AM

बंगळुरु : मोहालीतला पहिला कसोटी सामना जिंकल्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय क्रिकेट संघ आता बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर श्रीलंकेशी भिडणार आहे. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत आघाडी घेतली असून आता मालिका जिंकण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हा डे-नाईट कसोटी सामना असेल आणि या स्टेडियमवर हा पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळवला जाणार आहे. या दिवस रात्र कसोटी (Day Night Test) सामन्यात 100 टक्के क्षमतेनं प्रेक्षकांना प्रवेश मिळणार आहे. विराट कोलहीने (Virat kohli) त्याचं अखेरचं (कारकीर्दीतील 70 वं) शतक डे-नाईट कसोटीतच झळकावलं होतं. तसेच बंगळुरुचं एम. चिन्नास्वामी मैदान म्हणजे विराटसाठी दुसरं होम ग्राऊंडच आहे, त्यामुळे आजचा सामना भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसाठी खूप खास असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला भारताचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) हा 400 वा आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना आहे. त्यामुळे हा सामना जिंकण्यासाठी तसेच मालिकेत श्रीलंकेला व्हाईटवॉश देण्यासाठी भारतीय संघ आज मैदानात उतरेल.

नोव्हेंबर 2019 मध्ये याच मैदानात खेळवलेल्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारताने एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला होता. त्या सामन्यात विराटनं 136 धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर 28 डावांमध्ये विराट कसोटी शतक झळकावू शकलेला नाही. यापैकी 6 डावांमध्ये कोहलीनं 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. जानेवारीत केप टाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध उभारलेली 79 धावांची खेळी ही त्याची सर्वाधिक धावांची खेळी ठरली. विराटनं मोहालीमध्ये सामन्यात 45 धावा काढल्या होत्या. आता श्रीलंकेसमोर विराटला त्याच्या 71व्या शतकाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी चांगलं वातावरण आहे. दरम्यान, मोहालीतील पहिल्या कसोटीत एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या टेबलमध्ये भारताने पाचवे स्थान निश्चित केले आहे, त्यानंतर आता टीम इंडिया बंगळुरूमधील विजयासह गुणतालिकेत पुढे जाण्याचा प्रयत्न करेल.

भारतातल्या डे-नाईट कसोटीच्या पहिल्या डावात सव्वाशे धावा मुश्किल

भारतात खेळवण्यात आलेल्या आतापर्यंतच्या दोन डे-नाईट कसोटी सामन्यांमधील पहिल्या डावाचे आकडे पाहिले तर ते दोन्ही संघांना घाबरवू शकतात. भारतीय भूमीवर खेळल्या गेलेल्या शेवटच्या दोन डे-नाईट कसोटी सामन्यांमध्ये पहिल्या डावात अनुक्रमे 106 आणि 112 धावा झाल्या आहेत. बांगलादेशने भारतात पहिला डे-नाईट कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात यजमानांनी एक डाव आणि 46 धावांनी विजय मिळवला होता. बांगलादेशला पहिल्या डावात 106 धावा करता आल्या आणि भारताने पहिला डाव 9 विकेट गमावून 347 धावांवर घोषित केला. हा सामना कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवण्यात आला होता. भारतातील दुसरा डे-नाईट कसोटी सामना अहमदाबाद येथे इंग्लंड विरुद्ध खेळवण्यात आला होता. यामध्ये प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा संघ 112 धावांत आटोपला. भारताने हा सामना 10 गडी राखून जिंकला.

बंगळुरु… विराटचं दुसरं होम ग्राऊंड

गेल्या 14 वर्षांपासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कोहलीने या मैदानावर अनेक आयपीएल सामने खेळले आहेत, मात्र टीम इंडियासाठी तो केवळ 3 कसोटी सामने खेळला आहे. आणि त्यात त्याचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. कोहलीने या मैदानावर केवळ 4 डाव खेळले असून त्याची 60 पेक्षा जास्त सरासरीने 181 धावा केल्या आहेत. या मैदानावर कोहलीने कसोटीत एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले आहे. चिन्नास्वामी येथे त्याने पहिल्याच कसोटी डावात शतक झळकावलं होतं. टीम इंडियात नव्याने ओळख झालेल्या कोहलीने 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध 103 धावांची इनिंग खेळली होती. कोहलीच्या कारकिर्दीतील हे केवळ दुसरे आणि भारतातील पहिले शतक ठरले. त्यानंतर दुसऱ्या डावात त्याने 51 धावा केल्या.

भारताचा कसोटी संघ

रोहित शर्मा (कर्णधार), प्रियांक पांचाळ, मयंक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, सौरभ कुमार, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार)

इतर बातम्या

IND VS SL: कुलदीप यादवला संधी न देताच बाहेर का केलं? जसप्रीत बुमराहने दिलं अजब उत्तर

IPL 2022: लखनौचे 7.5 कोटी रुपये पाण्यात, मॅच विनर खेळाडूला जोफ्रा आर्चरसारखी दुखापत

IND vs WI: वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत वेस्ट इंडिज विरुद्ध भारत अजिंक्य, आकडे यावेळी बदलणार?

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.