AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका, धडाकेबाज फलंदाज मालिकेतून बाहेर; BCCI ची माहिती

बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून ऋतुराज गायकवाडला वगळण्यात आले आहे. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यानंतर त्याने उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाल्याची तक्रार केली होती.

IND vs SL: दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारताला मोठा झटका, धडाकेबाज फलंदाज मालिकेतून बाहेर; BCCI ची माहिती
Ruturaj Gaikwad
| Updated on: Feb 26, 2022 | 1:57 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) मैदानात सातत्याने चांगली कामगिरी करत असून विजय मिळवत आहे. पण मैदानाबाहेर संघाला खेळाडूंच्या फिटनेसच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. संघातील अनेक खेळाडू दुखापतींशी सतत झुंज देत असून या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. संघाचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) दुखापतीमुळे श्रीलंकेविरुद्ध सुरू असलेल्या टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे. एका वृत्तानुसार, 26 आणि 27 तारखेला धर्मशाला येथे होणाऱ्या सामन्यांमध्येही ऋतुराज खेळू शकणार नाही. ऋतुराजच्या जागी बॅकअप म्हणून मयंक अग्रवालचा (Mayank Agarwal) संघात समावेश करण्यात आला आहे.

ऋतुराज गायकवाड लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात खेळणार होता, परंतु सामन्यापूर्वी त्याच्या उजव्या मनगटाला दुखापत झाली. कर्णधार रोहित शर्माने याबाबत माहिती दिली होती. मनगटाच्या दुखापतीमुळे ऋतुराजला फलंदाजीत अडचणी येत असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही अपडेट जारी केले होते. वैद्यकीय पथक त्याची तपासणी करत असल्याचे बोर्डाने सांगितले होते.

ऋतुराजची NCA मध्ये रवानगी?

बीसीसीआयने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून ऋतुराज गायकवाडला वगळण्यात आले आहे. लखनौमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यानंतर त्याने उजव्या हाताच्या मनगटाला दुखापत झाल्याची तक्रार केली होती. यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने त्यांची तपासणी केली. नंतर एमआरआय स्कॅन करण्यात आले आणि तज्ञांचा सल्ला घेण्यात आला. ऋतुराज आता त्यावर उपचार घेऊन बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) या दुखापतीवर काम करणार आहे. निवड समितीने मयंक अग्रवालचा उर्वरित दोन टी-20 सामन्यांसाठी संघात समावेश केला आहे.

मयंक चंदीगडहून धर्मशाला येथे दाखल

दुखापतीमुळे या युवा फलंदाजाला (ऋतुराज) संपूर्ण मालिकेतून बाहेर बसावे लागणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, ऋतुराजच्या जागी सलामीवीर मयंक अग्रवालला तातडीने धर्मशाला येथे पाठवण्यात आले आहे. बॅकअप ओपनर म्हणून मयंक टीम इंडियाशी जोडला गेला आहे. मयंक अग्रवाल सध्या चंदीगडमध्ये भारतीय खेळाडूंसोबत कसोटी मालिकेची तयारी करत होता. अशा परिस्थितीत मयंकला एका बायो-बबलमधून दुसऱ्या बायो-बबलमध्ये ट्रान्सफर करणे संघ व्यवस्थापनासाठी सोपे होते. याआधी वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी मयंकचा बॅकअप म्हणून समावेश करण्यात आला होता.

ऋतुराजचं दुर्दैव

ऋतुराज गायकवाडच्या टीम इंडियात स्थान मिळवण्याच्या मार्गात सातत्याने अडथळे येत आहेत. याआधी, वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी त्याला कोरोनाची लागण झाली होती आणि त्यामुळे तो तिन्ही सामने खेळू शकला नाही. त्यानंतर वेस्ट इंडिजसोबतच्या टी-20 मालिकेत त्याला एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. आता श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये त्याला सलामीवीर म्हणून संधी मिळणार होती. परंतु दुखापतीमुळे त्याला त्याला संघाबाहेर बसावं लागणार आहे.

इतर बातम्या

IND VS SL: भारताला हरवण्यासाठी श्रीलंकेने निवडला मजबूत संघ, कसोटीसाठी टीमची घोषणा

IPL 2022: मुंबई इंडियन्सच्या ग्रुपमध्ये CSK चा संघ नाही, जाणून घ्या कुठल्या आधारावर दोन गटात झाली संघ विभागणी

IPL 2022 Schedule: मुंबई इंडियन्ससह अन्य संघांचे कोणाविरुद्ध किती सामने होणार, जाणून घ्या सर्व डिटेल्स

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.