AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL: टीम इंडियाच्या बसमध्ये काडतूसचे खोके मिळाल्याने खळबळ, चंदीगडमध्ये आहे कसोटी सामना

T20 सीरीज संपल्यानंतर भारत आणि श्रीलंकेमध्ये कसोटी मालिका (India vs Srilanka Test Series) सुरु होणार आहे. चार मार्चपासून पहिली कसोटी सुरु होणार आहे.

IND vs SL: टीम इंडियाच्या बसमध्ये काडतूसचे खोके मिळाल्याने खळबळ, चंदीगडमध्ये आहे कसोटी सामना
भारतीय संघाच्या बसमध्ये मिळाले काडतूस Image Credit source: Image Credit Source: AFP
| Updated on: Feb 27, 2022 | 5:59 PM
Share

चंदीगड: T20 सीरीज संपल्यानंतर भारत आणि श्रीलंकेमध्ये कसोटी मालिका (India vs Srilanka Test Series) सुरु होणार आहे. चार मार्चपासून पहिली कसोटी सुरु होणार आहे. दोन्ही संघाचे बहुतांश खेळाडू कसोटी मालिकेसाठी चंदीगडमध्ये दाखल झाले आहेत. मोहालीच्या (Mohali) PCA स्टेडियममध्ये पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. सध्या भारतीय संघातील खेळाडू चंदीगड येथील हॉटेलमध्ये उतरले आहेत. कसोटी संघात निवड झालेल्या भारतीय खेळाडूंना चंदीगडमध्ये पोहोचून आपला सराव सुरु केला आहे. खेळाडूंना हॉटेलवरुन स्टेडियममध्ये घेऊन जाण्यासाठी एक बस आहे. शनिवारी ही बस खेळाडूंच्या सेवेमध्ये असताना, काडतूसचे दोन खोके मिळाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

खेळाडूंना स्टेडियमपर्यंत सोडणाऱ्या बसमध्ये काडतूसचे खोके मिळाले आहेत. हे खोके 32 बोर पिस्तुलचे आहेत. तारा ब्रदर्सची ही बस आयटी पार्क स्थित हॉटेलच्या बाहेर उभी होती. याच हॉटेलमध्ये दोन्ही संघातील खेळाडूंच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. दैनिक जागरणने हे वृत्त दिलं आहे.

बसमध्ये काडतूसचे खोके मिळाल्याने खळबळ

टीमच्या बसमध्ये काडतूसचे खोके मिळाल्यानंतर बॉम्ब निकामी पथक आणि पोलिसांनी पोहोचून तपास सुरु केला. पोलिसांनी या प्रकरणात डीडीआर नोंदवला आहे. बसमध्ये काडतूसचे खोके मिळाल्यानंतर मोहालीच्या PCA स्टेडियमची तपासणी करण्यात आली. हे दोन्ही खोके सध्या पोलिसांनी जप्त केले आहेत.

श्रीलंके विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आर अश्विन, मोहम्मद शमी, उमेश यादव, शुभमन गिल, हनुमा विहारी, प्रियांक पंचाल, उमेश यादव, जयंत यादव, सौरभ कुमार आणि केएस भरत हे खेळाडू हॉटेल ललितमध्ये उतरले आहेत. विराट कोहली आणि ऋषभ पंत शनिवारी चंदीगडमध्ये दाखल झाले.

खेळाडूंना दुसऱ्या बसमधून पाठवलं

भारतीय खेळाडूंना शनिवारी प्रॅक्टिससाठी मोहालीच्या PCA स्टेडियममध्ये जायचं होतं. दुपारी एकच्या सुमारास बसची चेकींग करण्यात आली. या दरम्यान सीटच्या खाली काडतूसचे दोन खोके मिळाले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. खेळाडूंना दुसऱ्या बसमधून स्टेडियममध्ये पाठवण्यात आलं. बसमध्ये काडतूसचे खोके मिळाल्याने संघाच्या सुरक्षेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. श्रीलंकेचे खेळाडू सध्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहेत. 28 फेब्रुवारीपासून ते प्रॅक्टीस सुरु करतील.

ind vs sl two shells of 32 bore of bullet found in india vs sri lanka team bus in chandigarh test match mohali

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.