IND vs WI 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचं सावट, रवींद्र जडेजानं सांगितला Weather report, पाहा VIDEO

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता तिसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे बुधवारी म्हणजेच आज होणार आहे.

IND vs WI 3rd ODI : तिसऱ्या एकदिवसीय सामन्यावर पावसाचं सावट, रवींद्र जडेजानं सांगितला Weather report, पाहा VIDEO
रवींद्र जडेजानं सांगितला Weather reportImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jul 27, 2022 | 8:50 AM

नवी दिल्ली : भारताने पहिल्या दोन वनडे जिंकून मालिका आधीच जिंकली आहे. टीम इंडियाकडे (IND vs WI) आता क्लीन स्वीपची संधी आहे. वनडे सीरीज मधला शेवटचा सामना आज होणार आहे. एकदिवसीय आणि टी-20 मालिकेत इंग्लंडला पराभूत केल्यानंतर टीम इंडियान वेस्ट इंडिज गाठून कॅरेबियन दौऱ्याची धमाकेदार सुरुवात केली. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारताने 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन एकदिवसीय सामने जिंकून 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली. आता तिसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे बुधवारी म्हणजेच आज होणार आहे. हा सामनाही जिंकून भारताला वेस्ट इंडिजचा मालिकेत क्लीन स्वीप करायचा आहे. पण, हवामान यात अडथळा ठरू शकतं. कारण, तिसऱ्या वनडेदरम्यान पोर्ट ऑफ स्पेनमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तिसरी वनडे पावसात वाहून जाऊ शकते. यातच आता रवींद्र जडेजानंही (Ravindra Jadeja) आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही माहिती दिली आहे. त्यानं इन्स्टा स्टोरीवर एक व्हिडिओ (Video) शेअर केलाय. हे पाहता पोर्ट ऑफ स्पेनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या वनडेवर पावसाचा पाऊस पडू शकतो, असं वाटतंय.

रवींद्र जडेजानं सांगितला Weather report

मैदान कव्हरने झाकलं

जडेजानं स्टेडियमचा व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. मैदान कव्हरने झाकलं गेलं आहे. त्यामुळे भंरतीय संघाचे नेट सत्र रद्द झाले आणि जडेजा सराव करू शकला नाही. कुलदीप यादवही टी-20 मालिकेसाठी त्रिनिदादला पोहोचला आहे. त्याने आपल्या हॉटेलच्या खोलीतील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये बाहेर मुसळधार पाऊस दिसत आहे.

तिसरी वनडे

AccuWeather च्या अहवालानुसार बुधवारी पोर्ट ऑफ स्पेनमध्ये दिवसभर पावसाची शक्यता 80 टक्क्यांहून अधिक आहे. 5 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. दिवसभर ढगाळ वातावरण राहील आणि मधूनमधून पाऊस पडू शकतो. तापमान 30 अंशांच्या आसपास असेल. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग ताशी 20 किमी राहू शकतो. अशा परिस्थितीत जर सामना असेल तर वेगवान गोलंदाजांना या स्थितीत फायदा होऊ शकतो. मात्र, सामना होण्याची आशा फार कमी आहे.

संघ खालीलप्रमाणे

वेस्ट इंडिज: निकोलस पूरन (कर्णधार), शे होप (उपकर्णधार), शामराह ब्रूक्स, कीसे कार्टी, जेसन होल्डर, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, कीमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जेडेन सील्स, हेडन वॉल्श.

भारत: शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रशांत कृष्णा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.