AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI T20 मालिका अर्ध्यावर सोडून विराट कोहली घरी परतला, कारण काय? श्रीलंकेवरुद्धही खेळणार नाही

विराट कोहली (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघापासून (Indian Cricket Team) वेगळा झाला आहे. त्याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 मालिकेतील (India vs West Indies T20 Series) शेवटच्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे.

IND vs WI T20 मालिका अर्ध्यावर सोडून विराट कोहली घरी परतला, कारण काय? श्रीलंकेवरुद्धही खेळणार नाही
Virat Kohli
| Updated on: Feb 19, 2022 | 11:33 AM
Share

मुंबई : विराट कोहली (Virat Kohli) भारतीय क्रिकेट संघापासून (Indian Cricket Team) वेगळा झाला आहे. त्याला वेस्ट इंडिज विरुद्धच्या T20 मालिकेतील (India vs West Indies T20 Series) शेवटच्या सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. तो त्याच्या घरी गेला आहे. बायो बबलमुळे बीसीसीआयने विराट कोहलीला विश्रांती दिली आहे. कोहलीला 10 दिवसांची विश्रांती देण्यात आल्याचे वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. यापूर्वी असे वृत्त होते की, टीम इंडियाचा माजी कर्णधार 24 फेब्रुवारीपासून श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेचा भाग असणार नाही. ही मालिका लखनौमध्ये सुरू होणार आहे. यानंतर उर्वरित दोन सामने 26 आणि 27 फेब्रुवारी रोजी धर्मशाला येथे होणार आहेत.

पीटीआयने बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, होय, कोहली शनिवारी सकाळी त्याच्या घरी गेला. भारताने याआधीच मालिका जिंकली आहे. बीसीसीआयने निर्णय घेतला होता की सर्व फॉरमॅटमध्ये खेळणाऱ्या सर्व नियमित खेळाडूंना वेळोवेळी बायो बबलमधून ब्रेक दिला जाईल आणि त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेतली जाईल.

श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा बाकी

भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेसाठी टीम इंडियाची अद्याप निवड झालेली नाही. 19 फेब्रुवारीला रात्री संघाची घोषणा होऊ शकते, असे म्हटले जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेअंतर्गत दोन सामने खेळवले जाणार आहेत. हे सामने मोहाली आणि बंगळुरू येथे होणार आहेत. विराट कोहली कसोटी मालिकेत खेळणार आहे.

आगामी काळात भारताला सातत्याने क्रिकेट खेळायचे आहे. श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेनंतर अफगाणिस्तानविरुद्धदेखील मालिका सुरू झाल्याची बातमी आहे. त्यानंतर आयपीएल आहे. आयपीएलनंतर भारताला कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जावे लागले तर दक्षिण आफ्रिकेचा संघ मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येईल. वर्षाच्या अखेरीस T20 विश्वचषक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक मालिका खेळवली जाईल.

इतर बातम्या

23 वर्षीय फलंदाजाची कमाल, रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियातला रेकॉर्ड मोडित

IND vs WI: सामन्यानंतर रोहित शर्माला नाराजी लपवता आली नाही, म्हणाला….

Rishabh Pant: सीरीज सुरु असताना मध्यावरच BCCI ने ऋषभ पंतला दिला आराम

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.