AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : पहिल्याच कसोटी सामन्यात इशान किशनचा जलवा, असा पकडला झेल Watch Video

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत इशान किशनला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे. विकेटकीपर म्हणून त्याने टेस्ट कारकिर्दीतला पहिला झेल घेतला.

IND vs WI : पहिल्याच कसोटी सामन्यात इशान किशनचा जलवा, असा पकडला झेल Watch Video
IND vs WI : पहिल्या कसोटी सामन्यात इशान किशनला असं मिळालं यश, पाहा VideoImage Credit source: Twitter
| Updated on: Jul 12, 2023 | 10:13 PM
Share

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेतील साखळी फेरीतील पहिला सामना भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध खेळत आहे. दोन सामन्यांची कसोटी भारतासाठी महत्त्वाची आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाची मोट बांधण्यात आली आहे. प्लेइंग इलेव्हनमध्ये यशस्वी जयस्वाल आणि इशान किशन यांना संधी देण्यात आली आहे. पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. वेस्ट इंडिजने या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र लंचपर्यंत वेस्ट इंडिजला चांगलाच धक्का बसल्याचं दिसून आलं. 4 गडी झटपट बाद होत तंबूत परतले.

आर. अश्विनने वेस्ट इंडिजचे दोन गडी बाद केले. त्यामुळे वेस्ट इंडिजचा संघ बॅकफूटवर आला होता. टॅगनरीन चंद्रपॉलचा त्रिफळा उडवून त्याला तंबूत पाठवलं. त्यानंतर कर्णधार ब्रेथवेटला 20 या धावांवर असताना रोहितच्या हाती झेल करवून तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर लॉर्ड म्हणून ख्याती असलेल्या शार्दुल ठाकुरने दणका दिला. रेमन रेफरला बाद केलं. हा झेल इशान किशनने घेतला. हा त्याचा कसोटी कारकिर्दीतला पहिला झेल होता.

एकदम खाली असलेला झेल इशान किशन अलगद आपल्या ग्लोव्हमध्ये टिपला. रेफर अवघ्या 2 धावा करून तंबूत परतला. पहिल्या दिवशी लंचपर्यंत वेस्ट इंडिजने 68 धावांवर 4 गडी गमावले होते.

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रवींद्र जडेजा, इशान किशन, आर. अश्विन, शार्दुल ठाकुर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज.

वेस्ट इंडिज : क्रेग ब्रेथवेट, टॅगनरीन चंद्रपॉल, रेमॉन रेफर, जर्मिन ब्लॅकवूड, एलिक एथानझे, जोशुआ डासिल्वा, जेसन होल्डर, रहकीम कॉर्नवॉल, अल्झारी जोसेफ, केमर रोच, जोमे वॉरिकन.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.