AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI: अबब, किती तो खर्च! मँचेस्टर ते पोर्ट ऑफ स्पेनसाठी स्पेशल चार्टर्ड फ्लाइट, BCCI ने मोजले इतके कोटी रुपये

भारतीय क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India west indies Tour) आपल्या संघासाठी केलेला विमान प्रवासाचा खर्च चर्चेचा विषय बनला आहे.

IND vs WI: अबब, किती तो खर्च! मँचेस्टर ते पोर्ट ऑफ स्पेनसाठी स्पेशल चार्टर्ड फ्लाइट, BCCI ने मोजले इतके कोटी रुपये
team india Image Credit source: bcci
| Updated on: Jul 21, 2022 | 12:34 PM
Share

मुंबई: भारतीय क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिज दौऱ्यावर (India west indies Tour) आपल्या संघासाठी केलेला विमान प्रवासाचा खर्च चर्चेचा विषय बनला आहे. BCCI ने कमर्शिअल फ्लाइट ऐवजी आपल्या खेळाडूंसाठी चार्टर्ड विमान बुक केलं. मँचेस्टर ते पोर्ट ऑफ स्पेनसाठी बीसीसीआयने चार्टर्ड विमान बुक केलं. त्यासाठी बोर्डाने तब्बल 3.5 कोटी रुपये खर्च केले. BCCI जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. उद्या शुक्रवारी भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध पहिला वनडे (odi) सामना खेळणार आहे. टीम इंडिया सध्या त्रिनिदाद मध्ये आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर तीन वनडे आणि पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह या मुख्य खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. विराट कोहलीला वनडे आणि टी 20 दोन्ही सीरीजसाठी विश्रांती दिलीय.

चार्टर्ड विमान का बुक केलं?

भारतीय संघ मंगळवारी त्रिनिदाद मध्ये दाखल झाला. चार्टर्ड विमानात खेळाडूंसोबत त्यांच्या कुटुंबियांनाही सामावून घेण्याची व्यवस्था होती. बहुतेकदा खेळाडूसोबत त्यांच्या पत्नी, मुलं सुद्धा परदेश दौऱ्यावर जातात. चार्टर्ड विमान बुक करण्यामागे कोविड 19 हे कारण नाहीय. कमर्शिअल विमानात आवश्यक संख्येइतकी तिकीटं मिळत नव्हती, म्हणून बीसीसीआयने चार्टर्ड फ्लाइट बुक केली. इनसाइन स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. कमर्शिअल फ्लाइटच बिझनेस क्लासचं तिकिट काढलं असतं, तर सर्व तिकिटाचा खर्च 2 कोटीच्या घरात गेला असता, दीड कोटी रुपये वाचले असते. पण बोर्डाने चार्टर्ड फ्लाइटची निवड केली.

भारताची वनडे टीम

शिखर धवन (कॅप्टन), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, इशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), शार्दुल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्सर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृषणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह,

टीम इंडियाला पराभूत करणं अजून सोपं

टीम इंडियातील अनेक मोठे खेळाडू वनडे सीरीज मध्ये खेळत नाहीयत. त्यामुळे भारतीय संघाला हरवणं अजून सोपं होईल, असं निकोलस पूरनच मत आहे. त्रिनिदाद मध्ये होणाऱ्या वनडे मॅच आधी निकोलस पूरन दबावाचा खेळ खेळतोय. “अनेक भारतीय खेळाडू वनडे सीरीज मध्ये नाहीयत. त्यामुळे आमचं काम अजून सोपं होईल” असं पूरन म्हणाला. असं जरी पूरनने म्हटलं असलं, तरी टीम इंडियाची क्षमता देखील मान्य केली. “भारताकडे लाखो खेळाडू आहेत, जे संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात” असं पूरन म्हणाला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.