पहिल्याच चेंडूवर विराट कोहली OUT; 14 वर्षांनंतर घडली ‘तीच’ घटना, वेस्ट इंडिजने दिला जुन्या आठवणींना उजाळा, नेमकं काय घडलं?
Virat Kohli Golden Duck: वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. यानंतर त्याच्या नावावर नकोसा विक्रम झाला आहे.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. चंदीगड येथे झालेल्या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर जेसन सील्सने त्याला त्रिफळाचीत केले. यामुळे एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा पहिल्याच चेंडूवर बाद होणारा कोहली संयुक्तपणे दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे. किंग कोहलीसाठी हा खरोखरच एक लाजिरवाणा विक्रम आहे. तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीसोबत जे घडले, त्यामुळे १४ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.
न्यू चंदीगड येथील पीसीए स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात कॅरिबियन वेगवान गोलंदाज जेडन सील्सने एक जादुई चेंडू टाकून भारतीय दिग्गज विराट कोहलीला शून्यावर बाद केले. उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीची पहिल्याच चेंडूवर झालेली विकेट भारतीय चाहत्यांसाठी एका मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नव्हती. विराट कोहली खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. पण त्याचा डाव अशाप्रकारे संपेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती.
आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत शून्यावर बाद होण्याची ही ४१ वी वेळ आहे. तर भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पहिल्याच चेंडूवर बाद होण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तो आपल्या कारकिर्दीत २० वेळा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. या यादीत कोहली दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कोहली व्यतिरिक्त जवागल श्रीनाथच्या नावावरही १९ वेळा पहिल्याच चेंडूवर बाद होण्याचा नकोसा विक्रम आहे. आता प्रश्न असा आहे की, वेस्ट इंडिजविरुद्ध विराट कोहलीसोबत असे काय घडले, ज्यामुळे १४ वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेची आठवण झाली?
वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खातेही न उघडता विराट कोहली क्लीन बोल्ड झाला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १४ वर्षांनंतर ही घटना घडली. यापूर्वी तो २०१२ मध्ये चेन्नई येथे पाकिस्तानविरुद्ध क्लीन बोल्ड झाला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली पहिल्याच चेंडूवर बाद झाला. तो आतापर्यंत तीन वेळा तो वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. २०१३ मध्ये इंग्लंडविरुद्धही तो एकदा पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता.
यापूर्वी कोहली एकदिवसीय क्रिकेटमध्ये २०१९ मध्ये विशाखापट्टणम येथे वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली जेडन सील्सच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शून्यावर बाद होण्याची ही त्याची ४१ वी वेळ होती आणि ऑक्टोबर महिन्यातील ही चौथी वेळ होती. यापूर्वी कोहली गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दोनदा आणि २०२४ च्या ऑक्टोबरमध्ये एकदा शून्यावर बाद झाला होता.
