Womens World Cup: सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचं गचाळ क्षेत्ररक्षण, स्पर्धेत सोडले 18 झेल
वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले आहेत. या सामन्यात भारताच्या गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडलं. वर्ल्ड कप स्पर्धेत भारातने सर्वात खराब क्षेत्ररक्षण केल्याचं दिसून आलं आहे. उपांत्य फेरीतही झेल सोडत चूक केली.

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी 338 धावांचं मोठं लक्ष्य ठेवलं आहे. खरं तर हे आव्हान गाठणं सोपं नाही. त्यामुळे काही क्रीडाप्रेमींनी आधीच पराभव नक्की झालं, असं सोशल मीडियावर जाहीर केलं आहे. उपांत्य फेरीचं पोहोचण्याचं गणित भारतीय संघाने कसंबसं सोडवलं होतं. पण उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने भारतीय गोलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. या सामन्यातही भारताने झेल सोडत ऑस्ट्रेलियाला मोकळं रान दिलं. खरं तर क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस ही म्हण आहे. त्यातून भारतीय संघाने काहीच धडा घेतला नाही असं दिसत आहे. उपांत्य फेरीत झेल सोडल्याने त्याचा फायदा ऑस्ट्रेलियन संघाला झाला. इतकंच काय तर टीम इंडियाने या स्पर्धेत एकूण 18 झेल सोडले. त्यामुळे भारताने या स्पर्धेपूर्वी काय तयारी केली हे दिसून येत आहे. फलंदाजीत भारताने चांगली कामगिरी केली. पण गोलंदाजांना क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली नाही हे दिसत आहे.
कर्णधार हरमनप्रीत कौरने सोडला झेल
नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियमधील उपांत्य फेरीच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करणाऱ्या तिसऱ्या षटकात झेल सोडला. हा झेल कर्णधार हरमनप्रीत कौरने सोडला. रेणुका सिंहच्या गोलंदाजीवर मिड ऑफला एक सोपा झेल हाती आला होता. मात्र हरमनप्रीत कौरने पकडताना चूक केली आणि हीलीला जीवदान मिळालं. तेव्हा ती फक्त 2 धावांवर होती. पण ही चूक सहाव्या षटकात सुधारली गेली. कारण क्रांती गौडने तिला क्लिन बोल्ड केलं आणि हिली फक्त 5 धावा करून बाद झाली. म्हणजेच तीन धावांचं नुकसान झालं. त्यात ऑस्ट्रेलियावर दबाव टाकण्याची संधी गमावली. त्यानंतर थेट 26व्या षटकात टीम इंडियाला झेल पकडण्याची मिळाली आणि ती संधीही गमावलीय
अमनजोत कौरच्या गोलंदाजीवर विकेटकीपर ऋचा घोषने फीबी लिचफिल्डचा झेल सोडला. पण ऋचा स्टम्पच्या जवळ होती आणि झेल वेगाने आला होता. त्यामुळे पकडणं तसं कठीण होतं. पण भारताच्या खात्यात झेल सोडल्याची आणखी एक नोंद झाली. लिचफील्ड तेव्हा 102 धावांवर होती. त्यानंतर 119 धावा करून बाद झाली. म्हणजेच 17 धावांचं नुकसान झालं. झेल सोडल्याने या सामन्यात 20 धावा फुकटच्या गेल्या असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. भारतीय वुमन्स टीमने या स्पर्धेत एकूण 18 झेल सोडले. तर 35 झेल पकडले. म्हणजेच झेल पकडण्याची तुलना केली तर 66 टक्के आहे. त
