भारताकडे कसोटीत 227 धावांची आघाडी तरी बांगलादेशला फॉलोऑन का दिला नाही? काय आहेत नियम? जाणून घ्या
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फेरीतील महत्त्वाची कसोटी मालिका भारत आणि बांग्लादेश यांच्यात होत आहे. पहिला सामना जवळपास भारताच्या बाजूने झुकला आहे. पहिल्या डावात भारताकडे 227 धावांची मजबूत आघाडी होती. असं असूनही भारताने गोलंदाजी करण्याऐवजी फलंदाजीला पसंती दिली. नेमकं असं का? त्या मागचं कारण काय? फॉलोऑनचा नियम काय सांगतो? जाणून घ्या.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 या स्पर्धेतील अंतिम टप्प्याचे सामने सुरु आहेत. भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, बांग्लादेश आणि इंग्लंड यांच्यात अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी चुरस आहे. भारतीय संघ या गुणतालिकेत अव्वल स्थानी असून अंतिम सामन्यासाठी प्रमुख दावेदार आहे. भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. यातील पहिला सामना सुरु असून या साखळीत अजून 9 सामने खेळायचे आहेत. बांगलादेशविरुद्ध 1, न्यूझीलंडविरुद्ध 3 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामने खेळायचे आहेत. न्यूझीलंडविरुद्धची मालिका पुढच्या महिन्यात असणार आहे. तर नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. त्यामुळे बांग्लादेश आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. असं असताना भारताने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात घेतलेल्या निर्णयाची खूपच चर्चा रंगली आहे. भारताने पहिल्या डावात आर अश्विनच्या शतकी खेळीच्या जोरावर 376 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संपूर्ण संघ 149 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे भारताकडे 227 धावांची मजबूत आघाडी होती. क्रीडाप्रेमींना वाटलं की भारतीय संघ बांगलादेशला फॉलोऑन देईल. पण तसं झालं...
