AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli दिल्लीच्या स्टेडियममध्ये ज्या कारने पोहोचला त्याची किंमत ऐकून विस्फारतील डोळे

Virat Kohli : मैदानाबाहेर विराट कोहली काय करतोय, यावर नेहमीच मीडियाची नजर असते. मैदानाबाहेर विराटचा सार्वजनिक जीवनातील वावर नेहमीच चर्चेचा विषय असतो. विराटच्या लाइफ स्टाइलवरही त्याच्या फॅन्सची नजर असते.

Virat Kohli दिल्लीच्या स्टेडियममध्ये ज्या कारने पोहोचला त्याची किंमत ऐकून विस्फारतील डोळे
Virat-Kohli Image Credit source: PTI
| Updated on: Feb 16, 2023 | 7:44 AM
Share

IND vs AUS Test : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली मैदानावरील प्रदर्शनाबरोबर मैदानाबाहेरच्या घटनांमुळेही नेहमी चर्चेत असतो. मैदानाबाहेर विराट कोहली काय करतोय, यावर नेहमीच मीडियाची नजर असते. मैदानाबाहेर विराटचा सार्वजनिक जीवनातील वावर नेहमीच चर्चेचा विषय असतो. विराटच्या लाइफ स्टाइलवरही त्याच्या फॅन्सची नजर असते. विराटकडे एकापेक्षा एक महागड्या कारस आहेत. त्याच्या कार कलेक्शनबद्दल फॅन्समध्ये एक उत्सुक्ता दिसून येते. बुधवारी विराट दिल्लीच्या स्टेडियममध्ये त्याच्या कलेक्शनमधली एका ढासू कार घेऊन पोहोचला. त्यामुळे त्याची चर्चा होणं स्वाभाविक आहे.

चाहत्यांची एकच झुंबड उडाली

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये भारत-ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा कसोटी सामना होणार आहे. भारतीय टीमने बुधवारी 15 फेब्रुवारीला या स्टेडियममध्ये पहिल्यांदा सराव केला. विराट कोहली मूळचा दिल्लीचा आहे. तो गुरुग्राम येथील आपल्या घरातून एक महागडी कार घेऊन दिल्लीच्या स्टेडियममध्ये पोहोचला. कार आणि कोहली दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली होती.

विराटने काय कॅप्शन दिलं?

विराट कोहलीने स्वत: त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका स्टोरी पोस्ट केलीय. त्यात तो कारच्या आतमध्ये बसल्याचा फोटो आहे. बऱ्याच वर्षानंतर दिल्लीच्या स्टेडियममध्ये जाण्यासाठी लॉन्ग ड्राइव्हचा योग आला. जुन्या दिवसांची आठवण झाली असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं होतं.

कुठल्या ब्रांडची कार?

त्यानंतर टि्वटरवर विराट कोहलीच्या कारचा फोटो व्हायरल झाला. टीम इंडियाच्या नेट्सजवळच ही कार उभी होती. विराट स्टेडियमध्ये ज्या कारने आला, ती साधीसुधी कार नव्हती. प्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रांड पोर्शची पॅनामेरा टर्बो असं या कारच नाव आहे. या कारचा टॉप स्पीड काय?

आता तुम्हाला कारच नाव समजलं, तर त्याची किंमतही जाणून घ्या. या कारची एक्स शो रुम किंमत 2.34 कोटी रुपये आहे. फक्त 3.1 सेकंदात ही कार 0-100 किलोमीटर प्रतितास वेगाने पळू शकते. या कारचा टॉप स्पीड 315 किलोमीटर प्रतितास आहे. ही कार विराट कोहलीचा मोठा भाऊ विकास कोहलीने मे 2020 मध्ये विकत घेतली होती. त्यावेळी पोर्शने कोरोना लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा व्यवसाय सुरु केला होता.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.