
टीम इंडियाने गुरुवारी 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियावर चौथ्या टी 20i सामन्यात 48 धावांनी मात केली. भारताने या सलग दुसऱ्या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात बॅटिंग करताना 167 धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात 168 धावांचा पाठलाग करायला आलेल्या ऑस्ट्रेलियाची आश्वासक सुरुवात झाली. मात्र अक्षर पटेल याने ऑस्ट्रेलियाला पहिले 2 झटके दिले आणि भारतीय गोलंदाजांना चांगली सुरुवात करुन दिली. त्यानंतर भारतीय गोलंदाज कांगारुंवर तुटून पडले. भारतीय गोलंदाजांनी कांगारुंना ठराविक अंतराने झटके दिले आणि 18.2 ओव्हरमध्ये 119 रन्सवर गुंडाळलं. भारतासाठी वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. तर अक्षर पटेल आणि शिवम दुबे या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर इतरांनी चांगली साथ दिली. आता उभयसंघातील पाचवा आणि अंतिम सामना हा शनिवारी 8 नोव्हेंबरला होणार आहे.
भारताने चौथ्या टी20 सामन्यात ऑस्ट्रेलियाला 48 धावांनी पराभूत केलं. तसेच पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 2-1 ने आघाडी घेतली आहे. आता पाचवा सामना निर्णायक ठरणार आहे. हा सामना भारताने जिंकला तर मालिका खिशात घालेल. तर ऑस्ट्रेलियाला मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 167 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ऑस्ट्रेलियाचा संघ 119 धावांवर बाद झाला. भारताने हा सामना 48 धावांनी जिंकला.
जसप्रीत बुमराह याने बेन ड्वारशुईस याला 5 धावांवर बोल्ड करत ऑस्ट्रेलियाला नववा झटका दिला आहे. भारताचा यासह विजय निश्चित झाला आहे.
वॉशिंग्टन सुंदर याने ऑस्ट्रेलियाला सलग 2 झटके देत टीम इंडियाचा विजय निश्चित केला आहे. सुंदरने आधी मार्कस स्टोयिनस आणि त्यानंतर झेव्हीयर बार्टलेट या दोघांना 17 व्या ओव्हरमधील चौथ्या आणि पाचव्या बॉलवर सलग 2 झटके दिेले.
भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला सातवा झटका दिला आहे. वॉशिंग्टन सुंदर याने मार्कस स्टोयनिस याला 17 धावांवर आऊट केलं आहे. भारताने यासह सलग दुसऱ्या विजयाच्या दिशेने 1 पाऊल पुढे टाकलं आहे.
वरुण चक्रवर्ती याने त्याच्या स्पेलमधील शेवटच्या बॉलवर ग्लेन मॅक्सवेल याला आऊट केंल आहे. वरुणने मॅक्सवेल याला 2 धावांवर बोल्ड केलं. वरुणने अशाप्रकारे पहिलीवहिली विकेट मिळवली.
अर्शदीप सिंह याने त्याच्या कोट्यातील तिसऱ्या ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर पहिली विकेट मिळवत ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका दिला आहे. अर्शदीपने जोश फीलीप याला वरुण चक्रवर्ती याच्या हाती कॅच आऊट केलं.
शिवम दुबे याने फटकेबाजी करणाऱ्या टीम डेव्हीड याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे. शिवमने टीमला 12 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर कॅप्टन सूर्यकुमार यादव याच्या हाती कॅच आऊट केलं. टीमने 14 धावा केल्या.
शिवम दुबे याने मिचेल मार्श याला अर्शदीप सिंग याच्या हाती कॅच आऊट केलं. अशाप्रकारे भारताने ऑस्ट्रेलियाला तिसरा झटका दिला. मिचेल मार्श याने 30 धावा केल्या. त्याआधी अक्षर पटेल याने पहिले 2 विकेट्स घेतल्या.
अक्षर पटेल याने ऑस्ट्रेलियाला सलग आणि एकूण दुसरा झटका दिला आहे. अक्षरने नवव्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर जोश इंग्लिसला बोल्ड केलं. जोशने 12 रन्स केल्या.
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मिचेल मार्श याला टीम इंडियाच्या अभिषेक शर्मा याच्याकडून जीवनदान मिळालं आहे. वरुण चक्रवर्ती याने ऑस्ट्रेलियाच्या डावातील आठवी ओव्हर टाकली. मार्शने या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर मोठा फटका मारला. अभिषेकने 10-15 मीटर धावत येऊन कॅच घेतला. मात्र कॅच घेतल्यानंतर अभिषेक पडला. त्यामुळे अभिषेकच्या हातातून कॅच सुटला. अशाप्रकारे मार्शला जीवनदान मिळालं.
अक्षर पटेल याने टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून देत ऑस्ट्रेलियाची सेट आणि सलामी जोडी फोडली आहे. अक्षरने ऑस्ट्रेलियाला 37 धावांवर पहिला झटका दिला. अक्षरने मॅथ्यू शॉर्ट याला 25 रन्सवर एलबीडब्ल्यू आऊट केलं.
कॅप्टन मिचेल मार्श आणि मॅथ्यू शॉर्ट या सलामी जोडीने ऑस्ट्रेलियाला आश्वासक सुरुवात करुन दिली आहे. या जोडीने 168 धावांचा पाठलाग करताना पहिल्या 4 ओव्हरमध्ये 35 रन्स केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडिया पहिल्या विकेटच्या शोधात आहे.
ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्श आणि मॅथ्यू शॉर्ट ही सलामी जोडी मैदानात आली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 168 धावांचं आव्हान दिलं आहे.
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर चौथ्या टी 20I सामन्यात 168 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 167 रन्स केल्या. भारतासाठी शुबमन गिल याने सर्वाधिक 46 रन्स केल्या. तर ऑस्ट्रेलियासाठी नॅथन एलिस आणि एडम झॅम्पा या दोघांनी 3-3 विकेटस मिळवल्या.
ऑस्ट्रेलियाने भारताला झटपट झटके देत बॅकफुटवर ढकललं आहे. नॅथन एलिस याने वॉशिंग्टन सुंदर याला आऊट केलं आहे. सुंदरने 12 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.
एडम झॅम्पा याने टीम इंडियाचा विकेटकीपर जितेश शर्मा याला 3 धावांवर आऊट केलं आहे. भारताे अशाप्रकारे सहावी विकेट गमावली आहे. भारताने 17 ओव्हरनंतर 6 विकेट्स गमावून 137 धावा केल्या आहेत.
सूर्यकुमार यादव याच्यानंतर टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज तिलक वर्मा विकेटकीपरच्या हाती कॅच आऊट झाला आहे. एडम झॅम्पा याने तिलकला जोश इंग्लिस याच्या हाती 5 रन्सवर कच२ आऊट केलं. अशाप्रकारे भारताचा अर्धा संघ तंबूत परतला आहे.
भारताने निर्णायक क्षणी चौथी आणि महत्त्वाची विकेट गमावली आहे. झेव्हीयर बार्टलेट याने टीम इंडियाचा कॅप्टन सूर्यकुमार यादव याला टीम डेव्हीड याच्या हाती कॅच आऊट केलं. सूर्याने 10 बॉलमध्ये 20 रन्स केल्या.
टीम इंडियाला तिसरा झटका लागला आहे. सेट ओपनर आणि उपकर्णधार शुबमन गिल आऊट झाला आहे. शुबमनला अर्धशतक करण्याची संधी होती. मात्र शुबमन अर्धशतकाआधी 4 धावांवर बाद झाला. शुबमनने 39 बॉलमध्ये 46 रन्स केल्या.
पहिली विकेट गमावल्यानंतर शिवम दुबे याला फटकेबाजीच्या हिशोबाने तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी पाठवण्यात आलं. शिवमला चांगली सुरुवातही मिळाली. मात्र शिवम अपेक्षित फटकेबाजी करण्यात अपयशी ठरला. नॅथन एलिस याने शिवमला 12 व्या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर बोल्ड केलं. शिवमने 18 बॉलमध्ये 22 रन्स केल्या.
अभिषेक शर्मा याच्या रुपात भारताने पहिली विकेट गमावली. त्यानंतर कॅप्टन सूर्यकुमार यादव बॅटिंगसाठी मैदानात येणं अपेक्षित होतं. मात्र टीम मॅनेजमेंटने मोठा बदल केला. सूर्याऐवजी हार्डहिटर ऑलराउंडर शिवम दुबे याला तिसऱ्या स्थानी बॅटिंगसाठी पाठवलं आहे. त्यामुळे शिवम हा निर्णय योग्य ठरवणार का? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
भारताने अप्रतिम सुरुवातीनंतर पहिली विकेट गमावली आहे. अभिषेक आणि शुबमन या सलामी जोडीने भारतासाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र एडम झॅम्पा याने ही सेट जोडी फोडली. झॅम्पाने सातव्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर अभिषेकला टीम डेव्हीडच्या हाती कॅच आऊट केलं. भारताने अशाप्रकारे 56 धावांवर पहिली विकेट गमावली. अभिषेकने 28 धावा केल्या.
टीम इंडियाने पावरप्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता 49 धावा केल्या आहेत. शुबमन गिल याने 26 धावा केल्या आहेत. तर अभिषेक शर्मा 22 रन्सवर नॉट आऊट आहे.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया चौथ्या टी 20i सामन्याला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला टॉस जिंकून बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाकडून अभिषेक शर्मा आणि उपकर्णधार शुबमन गिल ही सलामी जोडी मैदानात आली आहे.
मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टिम डेव्हिड, जोश फिलिप, मार्कस स्टोयनिस, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, झेव्हीयर बार्टलेट, नॅथन एलिस आणि अॅडम झॅम्पा.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कॅप्टन), तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमराह.
ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्धच्या चौथ्या आणि निर्णायक टी 20I सामन्यात टॉस जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मिचेल मार्श याने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. आता भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियासमोर किती धावांचं आव्हान ठेवणार? याकडे चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
मिचेल मार्श (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस (विकेटकीपर), टिम डेव्हिड, मिचेल ओवेन, मार्कस स्टोइनिस, ग्लेन मॅक्सवेल, झेवियर बार्टलेट, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, मॅथ्यू कुहनेमन, जोश फिलिप, तन्वीर संघा आणि महली बियर्डमन.
सूर्यकुमार यादव (कॅप्टन), अभिषेक शर्मा, शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा (विकेटकीपर), शिवम दुबे, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, संजू सॅमसन (विकेटकीपर), रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी आणि हर्षित राणा.
यजमान ऑस्ट्रेलिया टीम इंडिया विरूद्धच्या चौथ्या सामन्यासाठी सज्ज आहे. मालिका 1-1 ने बरोबरीत असल्याने दोन्ही संघांचा हा सामना जिंकून मालिकेत 2-1 ने आघाडी घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र दोघांपैकी कोणत्या एकाच संघाला आघाडी घेता येणार आहे. त्यामुळे आता हा सामना कोण जिंकतं? याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून आहे.