IND vs AUS 1st ODI Highlights | टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय

| Updated on: Sep 23, 2023 | 1:46 AM

IND vs AUS 1st ODI 2023 Highlights in Marathi | भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिला वन डे सामना हा मोहालीतील आयएस बिंद्रा स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाला बॅटिंगसाठी भाग पाडलंय.

IND vs AUS 1st ODI Highlights | टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय
दरम्यान, विराट कोहली आणि अनुष्का यांची इन्स्टा स्टोरी सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. येत्या 8 ऑक्टोबरल भारताच्या मिशन वर्ल्ड कपला सुरूवात होणार आहे.

मुंबई | टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विजयी सलामी दिली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर पहिल्या वनडे सामन्यात 5 विकेट्सने विजय मिळवलाय. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 277 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 48.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं. टीम इंडियाकडून कॅप्टन याने नाबाद 58 धावांची खेळी केली. तर शुबमन गिल याने सर्वाधिक 74 धावांचं योगदान दिलं. ऋतुराज गायकवाड याने 71 धावा केल्या. तर सूर्याने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली.  टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 22 Sep 2023 09:46 PM (IST)

  IND vs AUS 1st Odi Live Score | टीम इंडियाची ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने मात

  मोहाली | कॅप्टन केएला राहुल याने सिक्स ठोकून टीम इंडियाला विजयी केलंय.  टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेलं 277 धावांचं आव्हान टीम इंडियाने 5 विकेट्सच्या मोबदल्यात 48.4 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.

 • 22 Sep 2023 09:26 PM (IST)

  IND vs AUS 1st Odi Live Score | टीम इंडियाला पाचवा झटका, सूर्यकुमार यादव आऊट

  मोहाली | टीम इंडियाने चांगल्या सुरुवातीनंतर झटपट 4 विकेट्स गमावले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आली. मात्र त्यानंतर कॅप्टन केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव या दोघांनी शानदार भागीदारी करत टीम इंडियाला आता विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे.

 • 22 Sep 2023 07:55 PM (IST)

  IND vs AUS 1ST Odi Live Score | टीम इंडिया बॅकफुटवर, शुबमन गिल आऊट

  मोहाली | टीम इंडियाला मोठा झटका लागलाय. ओपनर बॅट्समन शुबमन गिल आऊट झालाय. गिलने  63 बॉलमध्ये 74 धावा केल्या.  गिल आऊट झाल्याने टीम इंडियाची 25.3 ओव्हरमध्ये 3 बाद 151 अशी स्थिती झालीय.

 • 22 Sep 2023 07:48 PM (IST)

  IND vs AUS 1ST Odi Live Score | श्रेयस अय्यर रन आऊट

  मोहाली | टीम इंडियाने दुसरी विकेट गमावली आहे. ऋतुराज गायकवाड याच्यानंतर श्रेयस अय्यर आऊट झालाय. श्रेयस अय्यर 3 धावांवर रनआऊट झालाय.

 • 22 Sep 2023 07:38 PM (IST)

  IND vs AUS 1ST Odi Live Score | टीम इंडियाला पहिला झटका

  मोहाली | एडम झॅम्पाने टीम इंडियाला पहिला झटका दिला आहे. झॅम्पाने ऋतुराज गायकवाड याला एलबीडबल्यू आऊट केलं आहे. ऋतुराजने 77 बॉलमध्ये 71 धावांची खेळी केली.

 • 22 Sep 2023 07:19 PM (IST)

  IND vs AUS 1ST Odi Live Score | पुणेकर ऋतुराजचं अर्धशतक

  मोहाली | ऋतुराज गायकवाड याने वनडे क्रिकेटमधील पहिलंवहिलं अर्धशतक हे ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठोकलं आहे. ऋतुराजने 60 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केलंय.

 • 22 Sep 2023 07:04 PM (IST)

  IND vs AUS 1ST Odi Live Score | टीम इंडियाचा प्रिन्स शुबमन गिल याचं दमदार अर्धशतक

  मोहाली | शुबमन गिल याने आपल्या होम पीचवर 37 बॉलमध्ये खणखणीत सिक्सच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं आहे. शुबमनने 143 च्या स्ट्राईक रेटने हे अर्धशतक पूर्ण केलंय.

 • 22 Sep 2023 06:20 PM (IST)

  IND vs AUS 1ST Odi Live Score | टीम इंडियाची आश्वासक सुरुवात

  मोहाली | टीम इंडियाची 277 धावांचं पाठलाग करताना आश्वासक सुरुवात झाली आहे. ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल या दोघांनी चांगली सुरुवात केली आहे.

 • 22 Sep 2023 05:34 PM (IST)

  IND vs AUS Live Score : भारताला जिंकण्यासाठी 277 धावांचं आव्हान

  भारताने ऑस्ट्रेलिया संघाचा डाव 276 धावांवर गुंडळला, यामध्ये मोहम्मद शमी याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या.

 • 22 Sep 2023 05:17 PM (IST)

  IND vs AUS 1st Odi Live Score | जोस इंग्लिस आऊट

  मोहाली | जसप्रीत बुमराह याने जोस इंग्लिसला आऊट करत ऑस्ट्रेलियाला सातवा झटका दिला आहे. बुमराहने जोस इंग्लिसला श्रेयस अय्यर याच्या हाती कॅच आऊट केलं. इंग्लिसने 45 बॉलमध्ये 45 धावा केल्या.

 • 22 Sep 2023 04:40 PM (IST)

  IND vs AUS 1st Odi Live Score | सूर्यकुमारची चलाखी, ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का

  मोहाली | सूर्यकुमार यादव याने नॉन स्ट्राईक एंडवर दाखवलेल्या हुशारीमुळे ऑस्ट्रेलियाला पाचवा झटका लागला आहे. चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या कॅमरुन ग्रीन याला सूर्यकुमार यादवने पद्धतशीर रन आऊट करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला आहे.

 • 22 Sep 2023 04:26 PM (IST)

  IND vs AUS 1st Odi Live Score | पावसाचा ब्रेक, खेळाला सुरुवात

  मोहाली | टीम इंडिया-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाने एन्ट्री घेतल्याने खेळ थांबला होता. मात्र काही मिनिटांनंतर अखेर पुन्हा खेळाला सुरुवात झालीआहे.

 • 22 Sep 2023 03:55 PM (IST)

  IND vs AUS 1st Odi Live Score | ऑस्ट्रेलियाला चौथा झटका, अश्विनला पहिली विकेट

  मोहाली | आर अश्विन याने ऑस्ट्रेलियाला चौथा झटका देत पहिली विकेट घेतली आहे. अश्विनने मार्नस लबुशेन याला 39 धावांवर आऊट केलं.  विकेटकीपर केएल राहुल याने लबुशेनला स्टंपिंग केलं.

 • 22 Sep 2023 03:52 PM (IST)

  IND vs AUS 1st Odi Live Score | लबुशेन-ग्रीनने ऑस्ट्रेलियाला सावरलं

  मोहाली |  मार्नस लबुशेन आणि कॅमरुन ग्रीन या दोघांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला आहे. स्टीव्हन स्मिथ याच्या रुपात ऑस्ट्रेलियाने 112 धावांवर तिसरी विकेट गमावली होती. तिथपासून या दोघांनी ऑस्ट्रेलियाला सावरलंय.

 • 22 Sep 2023 01:48 PM (IST)

  ind vs aus live update : मोहम्मद शमीला पहिलं यश

  मोहम्मद शमी याने पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट घेत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. मिचेल मार्श याला तंबूत पाठवलं.

 • 22 Sep 2023 01:34 PM (IST)

  Ind vs Aus live Update :

  रुतुराज गायकवाड आणि रविचंद्रन अश्विन संघात एन्ट्री केलीय. गायकवाडसाठी ही मोठी संधी आहे तर दुसरीकडे अश्विनला वर्ल्ड कपमधील आपलं स्थान पक्क करण्यासाठी या मालिकेत चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.

 • 22 Sep 2023 01:14 PM (IST)

  ind vs aus live score : दोन्ही संघांची प्लेइंग 11

  ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, जोश इंग्लिस (W), मार्कस स्टॉइनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (C), शॉन अॅबॉट, अॅडम झम्पा

  भारत (प्लेइंग इलेव्हन): शुबमन गिल, रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W/C, इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी

 • 22 Sep 2023 01:12 PM (IST)

  IND vs AUS Live Score : कर्णधार राहुलचा प्रथम फिल्डिंगचा निर्णय

  भारत आणि ऑस्ट्रेलियामधील पहिल्या एकदिवसीय सामन्यामध्ये कर्णधार राहुलने प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.

Published On - Sep 22,2023 1:10 PM

Follow us
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला
पुढच्या वेळी चहापान नाही तर सुपारी पान? फडणवीसांचा विरोधकांना काय टोला.
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?
जरांगे पाटील जानेवारीत राजकारणात येणार? या आमदाराचा काय दिला संकेत?.
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?
हिवाळी अधिवेशनात NCP च्या दोन्ही गटांना एकच कार्यालय, नेमप्लेट कुणाची?.
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?
उनके बस की बात नही, मराठा आरक्षणावरून लोकसभेत विनायक राऊत काय म्हणाले?.
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?
शरद पवार यांनी घेतली उपराष्ट्रपतींची भेट, अचानक भेटीमागचं कारण काय?.
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?
'त्या' मंत्र्यांचं पोस्टमॉर्टेम व्हावे, राऊतांची शिंदेंना काय विनंती?.
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला....
गुणरत्न सदावर्ते यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य, डंके की चोट पर मला.....
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय
पोकळ घोषणांचा धूर,यंदाचं हिवाळी अधिवेशन वादळी? विरोधकांची बॅनरबाजी काय.
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा
नागपूर सज्ज, हिवाळी अधिवेशनादरम्यान तब्बल ११ हजार पोलिसांचा फौजफाटा.
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय
नवी मुंबईतील 'या' भागातून अल्पवयीन मुलं अचानक बेपत्ता, नेमकं घडतंय काय.