वर्ल्ड कप नाही जिंकलो, पण नव्या रेकॉर्डची नोंद, डिज्नी हॉटस्टारवर इतके कोटी लोक होते Live

India vs Australia final | वर्ल्ड कप फायनलमध्ये टीम इंडियाला विजय मिळाला नाही. पण ओटीटी प्लेटफॉर्म डिज्नी हॉटस्टारवर रेकॉर्ड झाला. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केलं. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर अंतिम फेरीचा सामना रंगला होता.

वर्ल्ड कप नाही जिंकलो, पण नव्या रेकॉर्डची नोंद, डिज्नी हॉटस्टारवर इतके कोटी लोक होते Live
Ind vs Aus Viewership record on disney hotstar
Follow us
| Updated on: Nov 20, 2023 | 11:15 AM

IND vs AUS Final | काल इंडिया-ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड कपची फायनल मॅच झाली. ही मॅच जिंकून ऑस्ट्रेलियाने इतिहासात आपल नाव नोंदवलं. सलग 10 सामने जिंकल्यानंतर टीम इंडिया फायनलमध्ये हरली. कोट्यवधी लोकांच मन मोडलं. कुठल्याही खेळात जय-पराजय असतो. दोन्ही टीम मेहनत करतात. वर्ल्ड कप टीम इंडियाने जिंकला नाही. पण हॉटस्टारवर मॅच पाहणाऱ्यांचा रेकॉर्ड मोडला. ही मॅच एकाचवेळी 5.9 कोटी लोकांनी Live पाहिली. टीम इंडियाच्या प्रत्येक विजयाच भारतीयांनी सलग सेलिब्रेशन केलं तसंच पराभवाचा सामना सुद्धा केला.

टीम इंडियाने संपूर्ण स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी दाखवली. फक्त कालच्या सामन्यात त्यांना त्याच परफॉर्मन्सची पुनरावृत्ती करता आली नाही. कोट्यावधी लोकांचे डोळे कालच्या मॅचकडे लागले होते. टीम इंडिया तिसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनणार अशा तमाम देशवासियांना विश्वास होता. पण दुर्देवाने असं घडलं नाही. कालचा दिवस ऑस्ट्रेलियाचा होता. आपल्यापेक्षा त्यांनी सरस खेळ दाखवला.

नव्या रेकॉर्डने प्रत्येक जुना रेकॉर्ड मोडला. याआधी भारत-न्यूझीलंडमधील सेमीफायनल विजयाच डिज्नी हॉटस्टारवर 5.3 कोटी लोकांनी सेलिब्रेशन केलं होतं. 5.3 कोटी लोकांनी लाइव स्ट्रीमिंग पाहिलं.

जगभरात जवळपास 5.9 कोटी लोकांनी डिज्नी हॉटस्टारवर फायनल मॅचच लाइव्ह स्ट्रीमिंग करुन नवीन रेकॉर्ड केला.

मागच्या महिन्यात भारत-पाकिस्तानमधील वर्ल्ड कप सामना 3.5 कोटी लोकांनी लाइव्ह पाहिला होता.

डिज्नी हॉटस्टारचा प्लान कसा आहे?

डिज्नी हॉटस्टारवर तुम्हाला वेब सीरीज, टीवी सीरियल आणि लेटेस्ट चित्रपट पहायचे असतील, तर तुम्ही सब्सक्रिप्शन विकत घेऊ शकता. त्याशिवाय एयरटेल, वोडाफोन आणि जियो रिचार्ज प्लानमध्ये सुद्धा तुम्ही सब्सक्रिप्शन घेऊ शकता. डिज्नी हॉटस्टारच महिन्याच सब्सक्रिप्शन फक्त 299 रुपयात मिळतं. त्याशिवाय इयरली प्रीमियम सब्सक्रिप्शन 1499 रुपयात येतं. हॉटस्टारचा सुपर प्लान 899 रुपयांचा आहे.

म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर
म्हणून मुस्लिम महिलांना बुरखा वाटले, विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर.
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार
अजितदादा गटातील माजी नगरसेवकाच्या पिस्तूलमधून चुलत भावाने केला गोळीबार.
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?
'लाडकी बहीण' योजनेत 12 'भामट्या' भावांनी भरला अर्ज , कशी झाली पोलखोल?.
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान
तर खुलासा करा, राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यानंतर मुंडेंचे आव्हान.
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले..
वादग्रस्त वक्तव्यानंतर स्पष्टीकरण, विरोधकांच्या टीकेवर राणे म्हणाले...
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी
अजित पवार बारामतीतूनच लढणार? दादा गटाचे 20 उमेदवार ठरले, बघा यादी.
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार
सुषमा अंधारेंना किती शिवसेना माहिती?त्या टीकेवर यामिनी जाधवांचा पलटवार.
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी
'भाजपात गेलो होतो, पण...'; नाराजी व्यक्त करत माजी आमदाराची घरवापसी.
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी
पूरस्थितीवर आमदार-खासदार असंवेदनशील? पाहणीसाठी गेले अन् स्टंटबाजी.
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार
'राऊत भैसाटलेले, त्यांच्या बुद्धीला लकवा', भाजपच्या नेत्याचा पलटवार.