AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG, 2nd T20, Match Preview: फॉर्म मध्ये असलेल्या खेळाडूला IN टीम ठेवण्यासाठी रोहित-विराट ओपनिंग करणार?

IND vs ENG, 2nd T20, Match Preview: इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) टी 20 सीरीज (T 20 Series) मध्ये भारतीय संघाने शानदार सुरुवात केली आहे. आता शनिवारी सीरीज जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरेल.

IND vs ENG, 2nd T20, Match Preview: फॉर्म मध्ये असलेल्या खेळाडूला IN टीम ठेवण्यासाठी रोहित-विराट ओपनिंग करणार?
virat-rohit Image Credit source: PTI
| Updated on: Jul 08, 2022 | 6:43 PM
Share

मुंबई: इंग्लंड विरुद्ध (IND vs ENG) टी 20 सीरीज (T 20 Series) मध्ये भारतीय संघाने शानदार सुरुवात केली आहे. आता शनिवारी सीरीज जिंकण्याच्या उद्देशाने भारतीय संघ मैदानात उतरेल. भारताने पहिल्या सामन्यात 50 धावांनी एकतर्फी विजय मिळवला. मालिकेत भारताकडे आता 1-0 अशी आघाडी आहे. दुसऱ्या टी 20 सामन्यात भारतीय संघ वेगळ्या खेळाडूंनिशी मैदानात उतरणार आहेत. कारण भारताने दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यासाठी वेगळ्या संघाची घोषणा केली आहे. शनिवारच्या सामन्यात  विराट कोहली (Virat Kohli) खेळताना दिसेल. पाच महिन्यानंतर तो टी 20 चा सामना खेळणार आहे. खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या विराट कोहलीवर दबाव असेल. कोहलीने फेब्रुवारी महिन्यात शेवटचा टी 20 आंतरराष्ट्री सामना खेळला होता. मागच्यावर्षी झालेल्या टी 20 वर्ल्ड कप नंतर विराट कोहली फक्त दोन टी 20 सामने खेळला आहे. यंदाच्या आयपीएलमध्येही त्याला सर्वोत्तम प्रदर्शन करता आलं नाही.

दीपक हुड्डा खेळणार?

टीमच्या रोटेशन पॉलिसीनुसार, विराट कोहली आणि सीनियर खेळाडूंना वेळोवेळी विश्रांती दिली जाते. विराटच्या जागी दीपक हुड्डा सारख्या युवा खेळाडूला संधी दिली. त्याला संघाबाहेर ठेवण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागू शकतो. कोहलीच्या जागी फलंदाजी करणाऱ्या हुड्डाने पहिल्या टी 20 सामन्यात इंग्लंड विरुद्ध 17 चेंडूत 33 धावांची खेळी केली. त्याला संघात कायम ठेवलं, तर विराट रोहित शर्मा सोबत ओपनिंगला येऊ शकतो. अशा स्थितीत इशान किशनला बाहेर बसवाव लागेल.

विराटच्या भविष्याच्या दृष्टीने दोन सामने महत्त्वाचे

विराट कोहलीला वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे सीरीजसाठी विश्रांती देण्यात आली आहे. विडिंज विरुद्धच पाच टी 20 सामन्यासाठी संघाची निवड झालेली नाही. इंग्लंड विरुद्धच्या दोन टी 20 सामन्यात विराट कसं प्रदर्शन करतो, त्यावरच विडिंज विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी त्याला संधी मिळणार की, नाही, ते ठरेल, एकूणच हे दोन सामने विराटच्या भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. इंग्लंड विरुद्ध रोहित शर्माने चांगली सुरुवात करुन दिली. त्याला मोठी खेळी करता आली नाही. पण त्याच्या फटक्यांमध्ये आत्मविश्वास दिसला. भारताने इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात पावरप्ले मध्ये 66 धावा केल्या. त्यानंतर विकेट गेल्यानंतरही धावांचा ओघ सुरु होता.

दुसऱ्या टी 20 साठी संघात अनुभवी खेळाडू

कोहली, ऋषभ पंत, विराट, रवींद्र जाडेजा आणि श्रेयस अय्यरचा संघात समावेश झाला आहे. त्यामुळे भारताचा संघ कागदावर तरी बलवान वाटतोय. पहिल्या सामन्यात भारताला एका फलंदाजांची कमतरता जाणवली. तरीही भारताने 198 धावा केल्या. भुवनेश्वर कुमारने आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलं. बुमराहच्या येण्याने गोलंदाजी अधिक घातक होईल. हार्दिक पंड्याने बॅट आणि बॉल दोघांनी उत्तम ऑलराऊंडर प्रदर्शन केलं.

फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.