India vs England 4th 2Oi | इंग्लंडच्या पराभवामागे ‘हिटमॅन’चा मास्टरप्लान, शार्दुल ठाकूरला कानमंत्र आणि टीम इंडिया विजयी

टीम इंडियाने चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t20i) इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. रोहित शर्माने (Rohit Sharma) शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) दिलेला सल्ला उपयोगी ठरला. त्यामुळे या सामन्याच चित्र पालटलं.

India vs England 4th 2Oi | इंग्लंडच्या पराभवामागे 'हिटमॅन'चा मास्टरप्लान, शार्दुल ठाकूरला कानमंत्र आणि टीम इंडिया विजयी
टीम इंडियाने चौथ्या टी 20 सामन्यात (india vs england 4th t20i) इंग्लंडचा 8 धावांनी पराभव केला. रोहित शर्माने (Rohit Sharma) शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) दिलेला सल्ला उपयोगी ठरला. त्यामुळे या सामन्याच चित्र पालटलं.

अहमदाबाद : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या चौथ्या टी 20 (India vs England 4th 2Oi) सामन्यात भारताने इंग्लंडला 8 धावांनी पराभूत केलं. या विजयासह भारताने 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली. मुंबईकर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) हा या विजयाचा शिल्पकार ठरला. शार्दुलने दबावात असतानाही सामन्यावर आपली छाप सोडली. सामना रंगतदार स्थितीत होता. मात्र त्यानंतरही शार्दुलने यशस्वीपणे शेवटची ओव्हर टाकत भारताला विजय मिळवून दिला. तसेच शार्दुलने 17 व्या ओव्हरच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर सलग 2 विकेट्स घेतल्या. हा या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. पण यामागे डोकं आहे ते (Rohit Sharma) हिटमॅन रोहित शर्माचं. (india vs england 4th t20i Rohit Sharma advice to shardul thakur is useful)

काय आहे रोहित कनेक्शन?

इंग्लंड बॅटिंग करत होती. सामन्यातील 15 वी ओव्हर. कर्णधार विराट कोहली दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला. त्यामुळे उपकर्णधार या नात्याने रोहितला कर्णधारपदाची जबाबदारी मिळाली. सामना रंगतदार स्थितीत होता. त्याच वेळेस रोहित शक्कल लढवली. विराट मैदानात असताना शार्दुल धावा लुटवत होता. पण रोहित आल्यानंतर त्याने आपल्या गोलंदाजीचा गियर बदलला.

निर्णायक क्षणी शार्दुलची शानदार गोलंदाजी

विराट मैदानात होता तोवर शार्दुलने आपल्या कोट्यातील 2 ओव्हर टाकल्या होत्या. त्याला यात एकही विकेट मिळाली नाही. मात्र यानंतर रोहितने शार्दुलला 17 वी ओव्हर टाकण्याची संधी दिली. यासोबतच रोहितने त्याला कानमंत्र दिला. यानंतर जे झालं ते सामन्याचं चित्र पालटवणारं होतं. शार्दुलने बेन स्टोक्स आणि इयोन मॉर्गन या महत्वाच्या फलंदाजांना सलग 2 चेंडूवर बाद केलं. त्यामुळे सामना टीम इंडियाच्या बाजूने झुकला. रोहितने दिलेला कानमंत्र शार्दुलने खरा ठरवला.

शार्दुलच्या 4 ओव्हरमध्ये 3 विकेट्स

शार्दुलने बेन स्टोक्स आणि इयॉन मॉर्गनला सलग 2 चेंडूवर बाद केलं. त्यामुळे त्याला हॅटट्रिकची संधी होती. पण त्याला हॅटट्रिक घेता आली नाही. पण यानंतर त्याने आणखी एक विकेट घेतली. शार्दुलने सामन्यातील शेवटची ओव्हर टाकली. यात त्याने 5 व्या चेंडूवर ख्रिस जॉर्डनला आऊट केलं. अशाप्रकारे शार्दुलने आपल्या 4 ओव्हरमध्ये 42 धावा देत निर्णायक क्षणी 3 विकेट्स घेतल्या.

सारे श्रेय रोहितला

शार्दुलने आपल्या बोलिंगचे सर्व श्रेय रोहितला दिलं. सामन्यानंतर शार्दुल म्हणाला की, ” रोहित मला म्हणाला की, तु तुझ्या शैलीनुसार गोलंदाजी कर. तसेच एका बाजूने सीमारेषा फार जवळ आहे. तो मुद्दा लक्षात ठेव. त्यानुसार गोलंदाजी कर, असा सल्ला मला दिला. मी त्यानुसार गोलंदाजी केली”.

शार्दुल सर्वात यशस्वी गोलंदाज

शार्दुलने 3 विकेट घेत आणखी एक कारनामा केला. तो टीम इंडियाकडून टी 20 क्रिकेटमध्ये 2020 पासून टीम इंडियाकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. शार्दुलने 2020 पासून आतापर्यंत 20 विकेट्स घेतल्या आहेत.

मालिकेत 2-2 ने बरोबरी

टीम इंडियाने या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत 2-2 ने बरोबरी साधली आहे. यामुळे मालिकेच्या दृष्टीने 5 वा सामना हा रंगतदार होणार आहे. हा 5 वा सामना 20 मार्चला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

India vs England 4Th T20i | शार्दुलचा भेदक मारा, सूर्यकुमारची अर्धशतकी खेळी, मुंबईकर खेळाडूंची विजयी कामगिरी

India vs England 2021, 4th T20 | अटीतटीच्या सामन्यात टीम इंडियाची इंग्लंडवर 8 धावांनी मात, मालिकेत 2-2 ने बरोबरी

(india vs england 4th t20i Rohit Sharma advice to shardul thakur is useful)

Published On - 10:43 am, Fri, 19 March 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI