IND vs ENG: इंग्लंडला रवाना होण्याआधी KL Rahul ची ‘अग्निपरीक्षा’, फेल झाला तर बाहेर

IND vs ENG: भारतीय संघासमोर पुढच्या महिन्यात इंग्लंडच आव्हान आहे. भारताला इंग्लंड दौऱ्यात एक कसोटी सामना, तीन वनडे आणि तीन टी 20 सामने खेळायचे आहेत.

IND vs ENG: इंग्लंडला रवाना होण्याआधी KL Rahul ची 'अग्निपरीक्षा', फेल झाला तर बाहेर
KL RahulImage Credit source: BCCI
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 5:08 PM

मुंबई: भारतीय संघासमोर पुढच्या महिन्यात इंग्लंडच आव्हान आहे. भारताला इंग्लंड दौऱ्यात एक कसोटी सामना, तीन वनडे आणि तीन टी 20 सामने खेळायचे आहेत. भारत आणि इंग्लंडमध्ये (IND vs ENG) मागच्यावर्षी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील एक सामना शिल्लक उरला होता. कोरोना व्हायरसमुळे हा कसोटी सामना रद्द झाला होता. ती कसोटी 1 ते 5 जुलै दरम्यान होणार आहे. भारतीय संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर (India England Tour) रवाना होणार आहे. मात्र त्याआधी उपकर्णधार के.एल.राहुलला (KL Rahul) अग्निपरीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेत नापास झाल्यास, त्याचं इंग्लंडच तिकीट रद्द होऊ शकतं. दुखापतीमुळेच केएल राहुलने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाच टी 20 सामन्यांच्या मालिकेतून माघार घेतली. एजबॅस्टन येथे होणाऱ्या कसोटीत तो खेळणार की नाही? यावर सस्पेन्स कायम आहे.

एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागेल

केएल राहुलची रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी टी 20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण मालिका सुरु होण्याच्या पूर्वसंध्येला त्याने दुखापतीमुळे माघार घेतली. राहुल बाहेर गेल्यानंतर त्याच्याजागी ऋषभ पंतला कॅप्टन बनवण्यात आलं. क्रिकबजच्या वृत्तानुसार, राहुल कधीपर्यंत मैदानाबाहेर राहील, याबद्दल काही स्पष्टता नाहीय. रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलच इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणं मुश्किल आहे. तो वनडे आणि टी 20 मध्ये खेळण्याबद्दलही साशकंता आहे. इनसाइड स्पोर्ट्ने दिलेल्या वृत्तानुसार, राहुलला शनिवारी एनसीएमध्ये फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे. त्याला स्वत:चा फिटनेस सिद्ध करावा लागेल.

रिप्लेसमेंटचा विचार होण्याची शक्यता कमी

भारताचा पहिला ग्रुप उद्या 16 जूनला दुसरा ग्रुप 19 जूनला रवाना होणार आहे. निवड समिती केएल राहुलच्या जागी रिप्लेसमेंटचा विचार करण्याची शक्यता कमी आहे. कारण त्यांनी आधीच 17 सदस्यीय संघ जाहीर केलाय. यात तीन सलामीवीर आहेत. रोहित शर्मा, शुभमन गिल हे दोन सलामीवीर आहेत. टीम मॅनेजमेंटने मागणी केली, तर मयंक अग्रवालला संधी मिळू शकते.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.