Rahul Dravid-Rohit Sharma जोडीचं टेन्शन वाढवणारी बातमी, इंग्लंड दौऱ्याआधी बसू शकतो झटका

टीम इंडिया (Team India) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेत अनेक मोठे चेहरे खेळत नाहीयत. काहींना विश्रांती दिलीय, तर काही दुखापतीमुळे बाहेर आहेत.

Rahul Dravid-Rohit Sharma जोडीचं टेन्शन वाढवणारी बातमी, इंग्लंड दौऱ्याआधी बसू शकतो झटका
इंग्लंड दौऱ्यापासून मिशन वर्ल्डकपच्या तयारीला लागतील राहुल द्रविड, सौरव गांगुलींनी सांगितला मास्टर प्लॅन
Image Credit source: PTI
दीनानाथ मधुकर परब, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jun 15, 2022 | 11:52 AM

मुंबई: टीम इंडिया (Team India) सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत व्यस्त आहे. या मालिकेत अनेक मोठे चेहरे खेळत नाहीयत. काहींना विश्रांती दिलीय, तर काही दुखापतीमुळे बाहेर आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेत ( T 20 series) केएल राहुल (KL Rahul) कॅप्टन होता. सीरीज सुरु होण्याआधी त्याला ग्रोइनची दुखापत झाली. त्यामुळे त्याला संपूर्ण मालिकेला मुकाव लागलं. आधी राहुलला झालेली दुखापत सामान्य असल्याचं सांगितलं जात होतं. पण आता त्याच्या इंजरीबद्दल जी बातमी येतेय, ती टीम इंडियासाठी झटक्यापेक्षा कमी नाहीय. टी 20 सीरीजमध्ये न खेळणारा राहुल आता इंग्लंड विरुद्ध एजबेस्टनमध्ये होणाऱ्या एकमेव कसोटी सामन्यात खेळेल का? या बद्दल साशंकता आहे. भारत आणि इंग्लंडमध्ये एकमेव कसोटी सामना 1 ते 5 जुलै दरम्यान खेळला जाईल. हा कसोटी सामना भारतीय संघाच्या मागच्या सीरीजमधला एक भाग आहे. कोरोनामुळे ही कसोटी त्यावेळी रद्द करण्यात आली होती. केएल राहुल भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधारही आहे.

राहुलच्या इंजरीवर सस्पेन्स

केएल राहुल सध्या बंगळुरुत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहे. क्रिकबजच्या वृत्तानुसार, त्याच्या दुखापतीचं स्वरुप अजून स्पष्ट नाहीय. तो कधी मैदानावर परतणार, या बद्दल सस्पेन्स कायम आहे. त्याच्या दुखापतीची अजून पूर्ण तपासणीही झालेली नाही.

एजबेस्टन कसोटीत खेळणं कठीण

सूत्रांच्या माहितीनुसार, केएल राहुलचं एजबेस्टन कसोटीत खेळणं कठीण दिसतय. वनडे, टी 20 मध्ये त्याच्या खेळण्यावरही सस्पेन्स कायम आहे. याचाच अर्थ राहुलला झालेली दुखापत गंभीर असू शकते. तो वनडे, टी 20 मधूनही माघार घेऊ शकतो.

पहिला ग्रुप कधी रवाना होणार?

इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाचा पहिला ग्रुप 16 जूनला रवाना होणार आहे. दुसरा ग्रुप 20 जूनला जाईल. यात हेड कोच राहुल द्रविड, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांची नाव आहेत.

हे सुद्धा वाचा

राहुल-रोहित जोडीचं टेन्शन वाढलं

केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये होता. आयपीएल 2022 च्या यशस्वी फलंदाजांपैकी तो एक आहे. त्याने 15 व्या सीजनमध्ये 600 पेक्षा जास्त धावा केल्या. पण सध्या तो दुखापतीच्या फेऱ्यात अडकलाय.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें